Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्काराने निताताई मुटकुळे सन्मानीत..

आष्टी आष्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.२ येथील शिक्षका श्रीमती निता मुटुकळे यांना स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ. भीमराव धोंडे,बीड जि.प.चे माजी सदस्य बीड उध्दवबापु दरेकर, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र गर्जे,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांंच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी माजी सभापती युवराज पाटील,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,कडा कृ.ऊ.बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे,व्हाईस चेअरमन सुभाष भादवे,जेष्ठ पत्रकार
प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, माजी चेअरमन सुरेश पवार बीडसांगवी सरपंच नंदकिशोर करांडे,संपत ढोबळे,विकासतात्या साळवे,बबनराव करांडे,सोमनाथ घुले,दादा साळवे,विजय करांडे,संतोषआबा करांडे,संतोष नरोडे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.निता मुटकुळे यापुर्वी मांडवा जिल्हा परिषद शाळा,देविगव्हाण,सोलेवाडी, जि.प.शाळा आष्टी येथे कार्यरत होत्या.सध्या त्या आष्टी येथील जिल्हा परिषद शाळा नं.२ आता सध्या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्या सतत काम करतात.कला,क्रिडा, सामाजिक उपक्रम राबविले आहेत.संजय सोले यांंच्या त्या पत्नी आहेत तर मंडव्याचे मुटकुळे मेजर यांंच्या त्या कन्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या