Ticker

6/recent/ticker-posts

संत आपल्याला विचाराची दिशा दाखवितात ----ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले

आष्टी संत आपल्याला विचारांना भरकटु देत नाहीत.संत महात्मे आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ सांगुन मोक्षमार्ग दाखवितात.पात्रता नसताना स्तुती करु नये स्तुती आणि वर्णन यात फरक आहे.विनाकारण कौतुक करायचे नाही आणि ज्याचा चांगुलापणा आहे त्याचे कौतुक केल्याशिवाय राहायचे नाही.संत आपल्याला विचाराची दिशा दाखवितात असे प्रतिपादन अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी केले.आष्टी तालुक्यातील जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास गदादे यांंच्या पत्नी कै.सौ.सीताबाई गदादे यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,अनंत हंबर्डे,चांडाळ चौकडीच्या करामतीमधील लोणकर आण्णा , राजेंद्र धोंडे,निळकंठ महाराज तावरे,दिनकरराव तांदळे महाराज,दिलीपराव काळे,ज्ञानेश्वर महाराज काळे,पत्रकार उत्तम बोडखे, आदिनाथ गवळी,राजेंद्र धोंडे,सरपंच पोपटराव गोंडे, माजी सरपंच पोपट धुमाळ,अशोक वाळके लोणकर अण्णा,डाॕ.संतोष जाधव,जिजाराम डोके,ॲड.नवनाथ विधाते,शेंडगे मुकादम, प्रदीप पवार सर,शिवाजी एकसिंगे,भाऊसाहेब कोकणे,मोहन घुले,कैलास बोराडे,निवृत्ती बन्सोडे,माजी सरपंच ज्ञानदेव सोनटक्के आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे , दिनकरराव तांदळे,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सर यांनी श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले म्हणाले की,आपल्या डोक्यात विचार असुन चालत नाही तर आपल्या योग्यतेचा विचार करणारे असेल तर त्याचा ईतिहास होतो.गुणवत्तेची किंमत करणारा असावा लागतो.गुणवत्तेला फुलविणारे सहवासात हवेत.दानशुर माणसाला पुन्हा मानवाचाच जन्म मिळतो.साधुसंत देवमान्य असतात राजकारणी लोकमान्य असतात.मर्यादित जीवन जगु नका,आपले जीवन विस्तारीत झाले पाहिजे. संत आणि भगवंत यांचेच ऐकायचे सर्व सामान्य माणसाचे ऐकायचे मात्र आचरण विचारपुर्वक करायचे.माणुस स्वतः कर्तबगार,उद्योगी,कष्टाळू मेहनती असला पाहिजे आणि त्याच्या घराण्याची पुण्याई असली पाहिजे आणि संबंधितावर भगवंताची कृपा असावी लागते.त्याचबरोबर थोर गुरुजन आणि संत यांचा आशीर्वाद असला पाहिजे त्यातून यशस्वी जीवन जगता येते.माणसाच्या अंगी जिद्द,चिकाटी,मेहनत आणि कष्टाळूपणा असेल तर तो यशस्वीपणे संसार करतो.त्यासाठी त्याला त्याची आर्थिक अडचण आणि परिस्थिती आडवी आली तरी त्यातून तो मार्ग काढून आपल्या यशाचा मार्ग सुकर करतो आसे सांगीतले.यावेळी ह.भ.प.बोधले महाराज यांनी "जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे " या अभंगावर अतिशय सुंदर असं निरूपण केलं. यावेळी ह.भ.प.तावरे महाराज म्हणाले की,जीवन जगत असताना मोक्षाची प्राप्ती करून घेतली पाहिजे.हाताने दान केलं पाहिजे,पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे.या माऊली कै.सीताबाई गदादे यांंच्याकडून तीर्थयात्रा आणि अन्नदान घडलं.गदादे कुंटुंबीयांनी केळसांगवी येथील श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या विकासाकरिता संस्थेच्या कामाकरिता ११ हजार १०१ रुपयेचा धनादेश यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिली.यावेळी बाल वारक-यांचे ह.भ.प.बोधले महाराजांनी तोंडभरुन कौतुक केले.सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी मुलं सुसंस्कृत होण्याकरता अध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाची जोड असणे हे गरजेचं आहे.हे दोन्हीही कार्य श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुरु असल्याचे सांगीतले.याप्रसंगी किर्तनाला साथ देण्याकरिता श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि ह.भ.प.भागवताचार्य नीळकंठ महाराज तावरे,शिवाजी महाराज,भाऊसाहेब महाराज, ज्ञानेश्वर महाराज,कैलास महाराज,दिनकर तांदळे महाराज,राऊतदादा आदि सामाजिक , राजकीय,धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या