Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील पं.नेहरू कनिष्ठ कॉलेजचा सुनिल जालिंदर पोकळे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकला माजी आमदार भीमराव धोंडे यांंच्याडुन शब्बासकी....

आष्टी आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे पंडीत जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सुनिल जालिंदर पोकळे याने कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा - २०२३ कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुदंड येथील साने गुरुजी विद्यालयात राज्यस्तरीत स्पर्धा नुकतीच पार पडली.या कुस्ती स्पर्धेत आष्टी येथील पंडीत जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सुनिल जालिंदर पोकळे याने १९ वर्ष वयोगट व ९२ किलो वजनगट फ्रिस्टाईल विभागात सहभागी होऊन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.खेळाडू सुनिल जालिंदर पोकळे याला बालपनापासून कुस्तीचे धडे वडील पैलवान जालींदर पोकळे यांच्याकडून मिळालेले आहेत.सुनिल जालिंदर पोकळे याच्या कुस्तीविषयी आकर्षणामुळे वडीलांनी त्याला महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सरावासाठी आष्टी येथील बाबाजी कुस्ती संकुलात पाठवले.सईद चाऊस यांनी मोठा सराव करून घेतला आहे. पैलवान सुनिल जालिंदर पोकळे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. ------------------------ आष्टी येथील पं.नेहरु कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पैलवान सुनिल जालिंदर पोकळे याची नुकतीच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कोल्हापूरच्या कुरुदंड येथे होणाऱ्या राज्यस्तरीत कुस्ती स्पर्धेसाठी निवड होऊन त्याने कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल आष्टी तालुक्यातील सर्व कुस्तीप्रेमीकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,भाजपा युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस डॉ.अजयदादा धोंडे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,विक्रम पोकळे,उत्तम बोडखे,शंकर देशमुख,सदाशिव दिंडे,संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.
डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,दत्तात्रय गिलचे,संजय शेंडे,पं.नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे,उपप्राचार्य सुनिल भवर,सर्व प्राध्यापकांनी सुनिल जालिंदर पोकळे यांंचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या