Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी- अहमदनगर - बीड - परळी नवीन लाईन हा एकूण लांबी २६१.२५ कि.मी. रेल्वे मार्ग आहे. मागील वर्षी २३ संप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ कि.मी.पुर्ण अहमदनगर ते न्यू आष्टी फेरी ही सुरू झाली आहे.या न्यू आष्टी ते बीड जवळील इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.रेल्वे मार्ग पुर्ण होत आहे.
यावर्षा अखेर अहमदनगर ते इगीनवाडी (बीड जवळ)पर्यंत रेल्वे धावणार आहे. एकूण २६१.२५ कि.मी.पैकी १३३.३ कि.मि.चे काम आता पुर्ण होऊन लवकरच रेल्वे धावणार असल्याने अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्णत्वास येण्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे प्रगती पथावर काम सुरू आहे.हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी.चा आहे.यापैकी २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर- न्यू आष्टी पर्यंत पूर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली.आता दुस-या टप्प्यात न्यू आष्टी ते बीड जवळील इनगवाडी हे काम या वर्षाअखेर पुर्ण होत आहे. आतापर्यंत पूर्ण झालेली कामे --------------- अर्थ वर्क- ४३० LCum / ४१८ LCum (९७ टक्के ),प्रमुख पूल- ६४/४९ (७७ टक्के ),छोटे पूल/RUB- ३०२/२४९ (८२ टक्के ), रोड ओव्हर ब्रिज- ६५/१४ (२१ टक्के ),रोड अंडर ब्रिज -१३०/११० (८५ टक्के ),स्टेशन इमारती २१/१० (२९ टक्के ),ट्रॅक लिंकिंग -२६१/११५ (११५ कि.मी.) SHXT (४४ टक्के ),पॉवर लाईन क्रॉसिंग -६२६/५६८ (९१ टक्के ),बॅलास्ट पुरवठा-७.५२/६.४४ एलसीएम (८६ टक्के ),विद्युतीकरण- निविदा मंजूर झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या