Ticker

6/recent/ticker-posts

धन न कमविणारे पण मनाने धनवान असलेले जेष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे

उत्तम बोडखे,आष्टी. --------------- सदैव,अहोरात्र,इतरांच्यासाठी दुसऱ्यांसाठी..आपल्या लेखणीच्या किंबहुना आपल्या बौद्धिक व्यापक परिपक्व सेवेच्या माध्यमातून गोरगरीब दीनदुबळ्या, अनाथ,अपंग,शेतकरी,शेतमजूर आणि वंचित घटकांच्या प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी उभे राहून कार्य करताना स्वतःसाठी फार काही करता आले नाही परंतु त्याची खंत न करता आपल्या कर्तुत्वाने लेखणीच्या समाजसेवेला सतत प्रमाणिक राहून आयुष्याच्या सायंकाळपर्यंत समाधानी आणि हसतमुख राहणारे अवलिया अशी काहींची प्रतिमा असते.अर्थात हे आष्टीतील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात ज्येष्ठ राजकारणी,पदाधिकारी,पोलीस अधिकारी यांच्या सदैव सहवासात राहूनही आपलं चांगुलपण कायम टिकवणारे..अर्थात आमचे पत्रकारितेतील गुरु आणि मार्गदर्शक प्रफुल्लभाऊ..६० वर्षाचे आयुष्यात फक्त आणि फक्त समाजसेवाच केली." सेवेत कधी मेव्याची "अपेक्षा न करणारा खरा समाजसेवक त्यांना म्हटले तर वावगे ठरणार नाही.सतत उत्साही आणि चिरतरुण व्यक्तीमत्व लाभलेले सर्वाचे "भाऊ" झाले.भाऊ या टोपणनावाने आष्टी,पाटोदा आणि शिरुर तालुक्यातील जनता त्यांना ओळखते.प्रचंड आत्मविश्वास असलेले आणि मन मनगट आणि बुध्दीच्या जोरावर ते नामांकीत आहेत.सुंदर लिखान,सुवाच्च अक्षर आणि अचुक भाषाशैलीत ते प्रथम स्थानावर आहेत.खरे म्हटल्यास "धन न कमविणारा पण मनाने धनवान" असे हे सर्वार्थाने वरिष्ठ पत्रकार.. पत्रकारांचे मार्गदर्शक आहेत. प्रफुल्लभाऊ यांंच्या मनगटाच्या समोरील पाचही बोटात प्रचंड चौफेर ज्ञानाची शक्ती आहे.आपुलकी,जिव्हाळा प्रेम,इतरांविषयी ह्रदयातून कर्तव्यपुर्ती म्हणून त्यांच्या लोकप्रियतेमुळे सर्वत्र त्यांच्याविषयीच्या आत्मियता.हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे आज प्रफुल्लभाऊंचा वाढदिवस!'कर्म हीच पूजा आणि ध्यास मानून आयुष्यभर अगदी निरलस वृत्तीने सतत काम करीत राहणे आणि जसे बोलतो तसेच करणे,जे करतो तेच बोलणे आणि बोलणे तेच लिहिणे अशा अत्यंत जीवनाचे चार दशके जनसामान्यांच्या हितासाठी,भल्यासाठी समर्पण करणारे आदर्शदायी व्यक्तिमत्व म्हणजे प्रफुल्लभाऊ! वाढदिवसानिमित्ताने ज्युनिअर पत्रकारांनी आणि राजकारणातील माजी मंत्री आ.सुरेश धस यांनी त्यांचा पत्रकारांसमवेत केला.खरे पाहता आ.धस यांंच्या राजकीय उदयात प्रफुल्लभाऊ यांचा २५ टक्के तरी वाटा आहे.आणि राजकारणात आ.धस यांचा मंत्री असो आथवा अधिकारी असो यांंच्याशी होणारा संपुर्ण पत्रव्यवहार फक्त आणि फक्त एकटेच प्रफुल्लभाऊ सांभाळतात..आ.धस यांना सतत चर्चेत ठेवणारे प्रफुल्लभाऊ हे एकमेव आहेत आसे मला वाटते.एकदा तर विद्दमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर आ.सुरेश धस यांना म्हणाले होते तुमचे हे पत्र लिहणारा पी.ए.कोण आहे त्याला मला पाहायचे आहे.त्याला घेऊन या... त्यावर आ.धस हे प्रफुल्लभाऊंना मुंबईला घेऊन गेले.अजितदादाची भेट घडविली.या भेटीमागचे कारण होते ते फक्त संक्षिप्त भाषेत मोठा आशय व्यक्त करणे आणि सुंदर,अचुक हस्ताक्षर हे होय..त्यांचा यथोचित सन्मान,सत्कार करून त्यांच्या कार्याला सलाम...या आदर,सत्कार-सन्मानाने प्रफुल्लभाऊ अक्षरशः गहिवरून गेले.प्रफुल्लभाऊ ६० वर्ष वयाचे आहेत.मराठवाड्याचे नामांकीत पत्रकारांसोबत त्यांनी अनेक वर्ष अत्यंत दर्जेदार लेखन करून जनतेची वाहवा मिळवली आहे.प्रफुल्लभाऊंनी सदैव काम करत राहणे हा मंत्र मनी बाळगला.कामातून जे मोठेपण मिळते ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अधिकारापोटीचे मोठेपण येते ते अधिकार संपताच निघून जाते,उरते ती एक व्यक्ती! आणि म्हणून प्रफुल्लभाऊ यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची प्रेरणा घेऊन अत्यंत मोठे कार्य प्रामाणिकपणे केले.आमच्या पत्रकार संघाचा अभ्यास दौरा असो,देवदर्शन दौरा असो ते सहभागी झाले,होतात.बालाजी,महाबळेश्वर,रायगड , तापोळा,गोवा,सिमला,कुलु मनाली, मुंबई,दिल्ली आदि दौऱ्यावर ते आले होते.तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा आत्मविश्वास आणि लेखन शक्ती निश्चितच आहे.आजही आष्टीतील पत्रकार परिषदेच्या बातम्या करतात.सर्वांना पाठवितात.बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक आणि लोकप्रियता सर्वमान्य आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने आपले पत्रकारितेतील लेखन क्षेत्रातील किंबहुना पत्रकारिता क्षेत्रातील गुरु म्हणून राजकीय,सामाजिक,धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक,सांस्कृतिक आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी बुध्दीमान व्यक्तिमत्व प्रफुल्लभाऊ यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार केला.प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे यांच्या सौभाग्यवती स्मिताताई यांच्या माध्यमातून प्रफुल्लभाऊंना कार्य करण्याची मोठी शक्ती आणि बळ मिळाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षच जाहीर केले आहे.३१ वर्षे अनाकलनीय गेले!'हेही सुरुवातीलाच त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या अर्धांगिनी स्मिताताई यांनी प्रफुल्लभाऊंच्या लेखणीला बळ दिले.मुलावर संस्काराची जबाबदारी पेलण्याची महत्वपूर्ण जिम्मेदारी त्यांनीच निभावली, हे मान्य करुन प्रफुल्लभाऊंनी स्मिताताई यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या,घर,दुकानदारी आणि इन्शुरन्सच्या माध्यमातून घरातील आर्थिक अपेक्षाही जेमतेम पूर्ण करण्यात सहभाग दिला.कधीच हट्ट धरला नाही! प्रफुल्लभाऊ लोकांच्या अन् स्मिताताई प्रफुल्लभाऊंच्या सदैव सेवेत राहिल्या! हे त्यांच्या पत्नीचे मोठेपण प्रफुल्लभाऊंनी स्वताः कबुल केले आहे.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब आणि स्व.प्रमोदजी महाजन यांच्या काळातील या कुटुंबांनी स्वयंपाक करून घालण्यापर्यंत मायाळूपणा अन् हृदयाची शीतलता ठेवलेली आहे.अपूर्वा आणि सुमेध या त्यांच्या दोन मुलांचे विवाह अत्यंत उत्तमरीतीने सर्वांच्या आशीर्वादाने समाजकार्याच्या कर्तव्या सोबतच पार पडले आहेत.प्रफुल्लभाऊ आणि स्मिताताई या पती-पत्नीच्या सदैव सामाजिक बांधिलकीच्या, प्रेमाच्या,आपुलकीच्या,जिव्हाळ्याच्या आणि सर्वांना सोबत हसत-खेळत जीवन जगण्याच्या जीवनपद्धतीला प्रफुल्लभाऊ यांना शुभेच्छा.प्रफुल्लभाऊ यांच्यासारख्या या व्यक्तिमत्त्वाला भविष्यातही मोठे कार्य करण्याची संधी प्राप्त व्हावी.यासाठी दिर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सद् विचाराची पेरणी केली जावी.वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा..... चौकट ------ 'कुणी मला रिटायर्ड होऊ देत नाही. --------------- ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊंनी सदैव दिवस-रात्र इतरांच्यासाठी आपले बुद्धिकौशल्य आणि लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कार्य केले आहे आणि म्हणून समाजातील विविध क्षेत्रातील मग ते पोलीस असो,राजकीय असो, सामाजिक असो,धार्मिक असो,वादविवाद मिटविणे असो सर्वच लोक त्यांच्या ज्ञानाचा सदैव उपयोग करून घेतात. या पार्श्वभूमीवर माझे निवृत्तीचे वय होऊनही मला कोणी रिटायर होऊ देत नाही असे प्रफुल्लभाऊ नि:संदिग्धपणे सांगतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या