Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी केरुळ येथील विवेक अनारसे यांचा कांदा पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला

आष्टी. आष्टी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.आष्टी तालुक्यात जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिली.जुलैमध्ये पाऊस पडला.त्यावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली.मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली.त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली.पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात चांगला पाऊस व्हावा ही अपेक्षा व्यक्त होत होती.पोळासण कोरडा गेल्याने दुष्काळाची चिंता वाढली होती मात्र गौरी आणि गणरायाचेआगमन झाले आणि पावसानेदेखील जोरदार पुनरागमन केले.सलग तीन दिवस आष्टी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.गुरुवारी रात्री,शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला.शुक्रवारी कडा आणि टाकळशिंग मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.शनिवारी गौरी विसर्जनाच्या दुपारी साडेतीननंतर जोरदार पाऊस सुरू झाला.आष्टी तालुक्यात सगळीकडेच हा पाऊस झाला.त्यामुळे आता रब्बी ज्वारी पेरणी होऊ शकते.पाणीसाठ्यात ही वाढ होईल.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात सुटेल अशी अपेक्षा आहे. शनिवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने डोईठाण आष्टी रस्त्यावरील बावी येथील पुल पाण्याखाली गेला होता.त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती.आष्टी तालुक्यातील केरुळ येथे विवेक अनारसे या शेतकऱ्याचा कांदा पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला.कालवडीचा ही मृत्यू झाला.नामदेव अनारसे (मेजर),कल्याण दाणी,बापू अनारसे,संतोष अनारसे,कृष्णा अनारसे, अंगद अनारसे,खेंगरे या सर्व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती पिकासह खरडून वाहुन गेली.त्यामुळे नुकसान झाले आहे.शनिवारी दुपारी आलेल्या पावसाने हे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या