आष्टी
प्रचंड शिट्ट्या..वन्स मोर..
नृत्याविश्कार आणि टाळ्यांच्या गजरामध्ये गणेश भक्तांनी अवघा मंच डोक्यावर घेत
महाराष्ट्राची लोकप्रिय गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णींच्या विविध अदाकारींना
प्रतिसाद देत हजारो यूवा रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः क्षितिज ठेंगणे केले!दरम्यान,
जगदंब प्रतिष्ठान हे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असल्याचा गौरवोद्गार सोनाली कुलकर्णी
ने केला आणि टाळ्यांच्या गजरात कार्यकर्ते अक्षरशः नाहून निघाले...निमित्त होते
अहमदनगरच्या पाथर्डी येथील जगदंब प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गणेश उत्सवातील
सांस्कृतिक कार्यक्रमाचे. गणेश आरती नंतर या लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात होताना



मंचावर अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे ,आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि कलावंत
तसेच जगदंब प्रतिष्ठानचे प्रमुख लोकप्रिय युवा कार्यकर्ते एडवोकेट प्रतीक खेडकर
उपस्थित होते.अहमदनगर जिल्ह्यातील जगदंब प्रतिष्ठान शेवगांव,पाथर्डी,तिसगाव
यांंच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीला आणुन युवावर्गात
चैतन्य निर्माण केले.पाच वर्षापुर्वी याच गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात
आपण खासदार डाॕ.सुजयदादा विखे पाटील आणि आमदार मोनिकाताई राजळे याच होतील म्हणालो
होतो गणेश कृपेने माझे भाकीत खरे ठरले. आताही पुन्हा खासदार विखेपाटीलच आणि आमदार
मोनिकाताईच होतील असा आत्मविश्वास जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,युवा नेते
ॲड.प्रतिकदादा खेडकर यांनी खासदार,आमदार,अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि हजारो
युवकांसमोर व्यक्त केला.पाथर्डी शहरात युवकांची व युवतींची प्रचंड गर्दी सोनाली
कुलकर्णी हीने खेचली होती.शहरात सर्वात मोठा व चर्चेतील हा कार्यक्रम ठरला.मराठी
सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या अदाकरी आणि नृत्याने
युवकांनी चांगलाच ठेक धरला..अप्सारा आली ..आणि ईतर लावण्यावर सोनाली हिने नृत्य
केले.तर उपअभियंता अशोक खेडकर यांची नात आणि ॲड.प्रतिकदादा खेडकर यांची कन्या
कु.वीरा प्रथम वाढदिवसानिमित्त सोनाली कुलकर्णी हीने खास शुभेच्छा दिल्या.. युवा
कार्यकर्ते आणि जगदंबा प्रतिष्ठानचे ॲड. प्रतीकदादा खेडकर यांच्या पुढाकारातून हा
सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.यापूर्वी जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून
दरवर्षी अत्यंत पवित्र उत्साह पूर्ण वातावरणातील गणेशोत्सवामध्ये विविध
सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झालेले आहे. यंदाही जगदंबा प्रतिष्ठान आयोजित
गणेशोत्सव २०२३ मध्ये विविध धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रमांना प्राधान्य
देण्यात आले होते.युवानेते ॲड.प्रतीकदादा खेडकर यांनी त्यांच्या असंख्य
पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आणि गणेश भक्तांच्या आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने यंदा
गणेश भक्तांच्या ज्ञानार्जन आणि करमणुकीसाठी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री
सोनाली कुलकर्णी यांना खास विशेष आमंत्रित केले होते.सोनालीचे गणेश मंडळाच्या
मंचावर आगमन होताच प्रचंड टाळ्या पडल्या. गणेशभक्तांशी तीने आपली कला,अदाकारीसह
संवाद साधला.जगदंबा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाथर्डी व
तालुक्यामध्ये अत्यंत पवित्र अध्यात्मिक सुगंधी वातावरण तयार झाले होते.श्री गणेश
येत्या काळात गणेश भक्तांच्या इच्छा पूर्ण करून शेतकरी ऊसतोड कामगारांच्या आणि
सर्वसामान्यांच्या जीवनात सुख यश आनंद आणि भरभराट आणेल असा विश्वास जगदंबा
प्रतिष्ठानचे ॲड.प्रतीकदादा खेडकर यांनी व्यक्त केला.पाथर्डीचा राजा जगदंब गणेश
मंडळाने शहवासीयांची मने जिंकली.विविध सामाजिक उपक्रमांतून सर्वांच्या पसंतीस
उतरलेले जगदंब प्रतिष्ठान गणेशोत्सव पाथर्डी २०२३ च्या अध्यक्ष निखिल चिंतामणी,
उपाध्यक्ष अजय विघ्ने,खजिनदार सौरभशेठ दानापुरे यांनी जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक
अध्यक्ष ॲड.प्रतिकदादा खेडकर यांंच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त दि.२५
सप्टेंबर रोजी मंडळाचे सर्व सदस्यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीचा कार्यक्रम
पार पाडला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमास खा.डाॕ.सुजयदादा विखे,आ.मोनिकाताई राजळे हे
प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहिले होते.तर यावेळी नगराध्यक्ष डाॅ.मृत्युंजय
गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,नगराध्यक्ष अभय आव्हाड,पाथर्डी येथील
नगरपालीकेचे सर्व माजी नगरसेवक,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व सर्व कर्मचारी,अजय
रक्ताटे,बंडुशेट बोरुडे,भैय्या बोरुडे,पंकज मगर, प्रसाद देशमुख,बबलू शिरसाट,नवनाथ
ढाकणे,पत्रकार उत्तम बोडखे,प्रविण पोकळे, संतोष मोटे,अविशांत कुमकर,आकाश
डोंगरे,रुषी काकडे,पाथर्डी शहरातील व्यापारी बंधु व प्रतिष्ठित तसेच पाथर्डी
तालुक्यातील सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य,जगदंब प्रतिष्ठान गणेश मंडळ सदस्य
निखिल चिंतामणी,उपाध्यक्ष अजय विघ्ने, खजिनदार सौरभशेठ दानापुरे,आजिनाथ
डोमकावळे,शाहरुखभाई,पवन दहीफळे सर्व जगदंब युवा प्रतिष्ठान शेवगाव,तिसगाव,पाथर्डी
शाखा प्रमुख व सदस्य उपस्थित होते.यावेळी पाथर्डी आणि परिसरातील नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित राहीले होते.उपस्थितांचे मुख्यसंयोजक ॲड.प्रतिकदादा खेडकर यांनी
मनापासून आभार मानले. ------------------------
0 टिप्पण्या