Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी शहरात समर्थ गणेश मंडळाने पहिल्याच वर्षी बाल वारकरी, टाळ मृदंगाच्या गजरात केले श्री विसर्जन.

आष्टी. आष्टी शहरातील मुर्शदपुर,दत्तनगर भागात अशोक डोके महाराज यांंच्या पुढाकाराने याचवर्षी समर्थ गणेश मंडळ स्थापन करुनविविध धार्मिक कार्यक्रमाने गणेशोत्सव साजरा केला.या भव्य दिव्य गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आष्टी येथील स्वामी बँन्ड,मुळेवाडी येथील श्री दत्त वारकरी शिक्षण संस्थेतिर्थ येथील शालेय विद्यार्थी भजनी मंडळ पथक,आष्टी येथील वाइफ डान्स अकॅडमीचे छोट्या विद्यार्थ्यांचे डान्स पथक,श्री शंभू सूर्य शिवकालीन मर्दानी खेळ व काम प्रशिक्षण संस्था जामखेड विभाग मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयाचे विद्यार्थी पथक,या चार पथकाच्या भव्य दिव्य मिरवणुकीने आष्टी येथील गणेश भक्त भारावून गेले.आष्टी शहरांमध्ये आणि परिसरात याच गणेश मंडळाची चर्चा होती.या गणेश मंडळाने केलेल्या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक झाले.या मंडळाचे प्रमुख संयोजक अशोक डोके महाराज यांनी कोणाकडूनही एक रुपया वर्गणी न घेता स्वखर्चाने शालेय विद्यार्थ्यांकरीता सार्वजनिक पाच फुटाची मोठी श्री गणेशमूर्ती स्थापना केली. यानंतर या दहा दिवसात शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या.त्यांना बक्षिसे,शालेय वस्तू वाटप केले.यामध्ये मुले व मुली स्वतंत्र गटासाठी क्रिकेट स्पर्धा,कबड्डी स्पर्धा,हॉलीबॉल स्पर्धा,या मैदानी स्पर्धा घेतल्या.यांना प्रत्येकी ५५१ रुपये देण्यात आले.रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,सामान्य ज्ञान(जनरल नॉलेज) स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये प्रत्येक प्रथम,द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले.गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी बाल वारकरी,विद्यार्थी, चार पथकाने भव्य दिव्य मिरवणुकीने गणेश विसर्जन मिरवणूक झाली.आष्टी शहरातूनही मिरवणूक किनाराचौक,शिवाजीचौक,शनिचौक मार्गे ही मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाली.आष्टी शहरातील मोठ्यासंख्येने गणेश भक्तांनी गर्दी करून यामध्ये असलेल्या भजनी मंडळ विद्यार्थ्यांचे व शिवकालीन मर्दानी खेळ,दांडपट्टा ,तलवारबाजी,ढाल तलवार यांचे प्रात्यक्षिके दाखवून शहरातील लोकांचे मन जिंकले.या संपूर्ण गणेशोत्सवाचे कोणाकडूनही एकही रुपया वर्गणी न घेता स्वखर्चाने आष्टी येथील गणिताचे आदर्श शिक्षक अशोक डोके सर यांनी हे सर्व कार्यक्रम घेतले.बक्षीस विद्यार्थ्यांना बक्षीस दिले.विसर्जनानंतर शालेय विद्यार्थ्यांना आणि आष्टी शहरातील सर्व गणेश भक्तांना गोडजेवण देण्यात आले.मोठ्या संख्येने सर्व आष्टीतील गणेश भक्त उपस्थित होते.या मिरवणुकीमध्ये पंडित नेहरू विद्यालय आष्टी,वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी,जि.प.कन्या प्रशाला आणि गणेश विद्यालय आष्टी या शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका शिक्षकाने एक आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करून आदर्श निर्माण केला असल्यास चर्चा शहरात आहे.अशोक डोके सर यांचे माजी आ. भीमराव धोंडे,आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे, जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे,दिनकरराव तांदळे महाराज,नगरपंचायत
आष्टी,तालुका पत्रकार संघ,तालुका वकील संघ या सर्वांनी विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या