आष्टी



बीड जिल्ह्यात लम्पी या जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या साथीने पुन्हा डोके
वर काढले आहे.जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १६८ ठिकाणी सध्या लम्पीबाधित जनावरे आढळून
आलेली आहेत.त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढल्यास
साथीचा फैलाव होऊ शकतो.त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी याबाबत बुधवारी
दि.१३ सप्टेंबर रोजी आदेश काढले होते.त्या आदेशानुसार आ.सुरेश धस यांनी पोळा सण
अत्यंत साध्यापणाने करत शेतक-यांनीही यावर्षी बैलपोळा साध्या पध्दतीने साजराकरून
प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन आ.धस यांनी केले आहे.जिल्ह्यात गोवंशीय
जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे.सध्या १९
तालुक्यांतील १६८ ठिकाणी लम्पीबाधित जनावरे आहेत.त्यामुळे आज साजरा होणाऱ्या पोळा
या सणासाठी बैलांच्या मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे
शेतकऱ्यांना यंदा गोठ्यातच पोळा साजरा करावा लागणार असल्याचे आ धस यांनी
सांगीतले.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या सर्जा-राजाचा सण
म्हणजे पोळा दरवर्षी जिल्ह्यात शेतकरी बांधव हा सण उत्साहात साजरा करत असतात.मात्र,
यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी पिके सुकून गेली असल्याने
उत्पन्नात मोठी घट होणार आहे.पेरणी,मशागतीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी असताना यंदा बैलांच्या साजशृंगाराच्या साहित्याचे दरही
२० टक्क्यांनी वाढले आहेत.जिल्ह्यात सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने सर्व
प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.त्यामुळे बैलांना नदी,तळ्यावर नेऊन अंघोळही घातला येणार
नाही.त्यामुळे बैलपोळ्याचा उत्साह कमीच असताना दुसरीकडे, पोळ्याला बैलांना सजवून
त्यांची मिरवणूक काढली जात असते. मात्र जिल्ह्यात लम्पी या जनावरांना होणाऱ्या
चर्मरोगाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे.पोळ्याच्या दिवशी बैलांची एकत्रित
सार्वजनिक मिरवणूक काढल्यास साथीचा फैलाव होऊ शकतो.यामुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ
यांनी काढलेल्या आदेशानेच आपण पोळा हा सण साध्या पध्दतीने साजरा करत आहे.या रोगाचे
गांभीर्य लक्षात घेऊन शेतक-यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे अवाहन आ.सुरेश धस
यांनी केले आहे.
---------------------------
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार
संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी बैलपोळा सणानिमित्त आपल्या लाडक्या सर्जा राजाची
सहकुटुंब पूजा केली.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या आदेशानुसार लंपिकच्या
प्रादुर्भावामुळे मिरवणूक न काढता घरामध्ये बैलांची पूजा करून मतदार संघातील सर्व
शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा देत आपल्या लाडक्या बैलांसह इतर जनावरांची
काळजी घ्या असे आवाहन शेतकऱ्यांना आ.आजबे यांनी केले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे
त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सविता बाळासाहेब आजबे ,यश बाळासाहेब आजबे उपस्थित होते.
0 टिप्पण्या