




उत्तम बोडखे,आष्टी,
..............
आजही या वयात हंबर्डे सर यांची उर्मी त्यांना
स्वस्थ बसू देत नाही. अगदी या वयात देखील त्यांचे निरीक्षण,वाचन, अभ्यास आणि चिंतन
अखंडपणे सुरू आहे.त्यांचे विविध विषयांवर आणि मराठी, हिंदी,इंग्रजी आणि उर्दु
भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्याकडे विचारधन आहे.राजकीय विषयावरील त्यांचे
निरीक्षण अभ्यास करण्यासारखे आहे. मराठी,हिंदी,इंग्रजी आणि उर्दू या भाषा विषयांसह
इतिहास आणि भूगोल याबाबतही हंबर्डे सरांचे ज्ञान अगाध आहे. समाजातील प्रत्येक
घटकाविषयी त्यांना तळमळ आहे. आष्टी या जन्मभूमी आणि कर्विमभूमी विषयी त्यांना
विलक्षण आत्मीयता आहे.या मातीशी इमान असल्यामुळे या परिघाबाहेर जाण्याच्या अनेक
सुसंधी सोडून त्यांनी ईथेच राहणे पसंत केले. याभागाच्या सामाजिक, अध्यात्मिक,
शैक्षणिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी अंतरीचे सर्वस्व अर्पण केले
आहे.ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सर एक बुद्धीवंत आणि कणा असलेल्या हस्तलेखक असे
प्रतिपादन ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज गहिनाथगडकर यांनी केले.तसेच ज्येष्ठ पत्रकार
अनंत हंबर्डे सर यांच्या रूपाने एका साहित्यिकाच्या माध्यमातून नवी पेरणी झालेली
आहे.राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,वैचारिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रात आपल्या खास
वैशिष्ट्यपूर्ण लेखणीने नवी क्षितिजे निर्माण करणारे माजी उपप्राचार्य तथा ज्येष्ठ
साहित्यिक अनंत हंबर्डे सर आहेत. मराठवाड्याच्या साहित्य विश्वातील मुकुटमणी म्हणून
हंबर्डे सर शोभून दिसतात.बीड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात ५० वर्षापेक्षा
जास्त काळ प्रभावशाली,गौरवशाली अशी कारकिर्द गाजवत नव्या पिढीतील अनेक पत्रकारांना
अनंत हंबर्डे सर यांनी घडविले आहेत.अनंत हंबर्डे सर म्हणजे आष्टी तालुक्याचा हा
चालताबोलता इतिहास आणि शब्दकोश आहे असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे,माजी
आ.साहेबराव दरेकर यांनी केले. आष्टी शहरातील पंचायत समिती सभागृहात आयोजित पुरस्कार
प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बाबुसशेठ भंडारी,सुनिता
अनंत चौधरी,नामदेव राऊत,कवी हरिष हातवटे,प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,विजय आमटे,शंकर
देशमुख,अशोक साळवे, बाबासाहेब पिसोरे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,महेश
आजबे,समाजसेवक विजय गोल्हार,ह.भ.प.निवृतीदादा बोडखे, वाल्मिकतात्या निकाळजे,माजी
आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर यांची भाषणे झाली. यावेळी भीमराव
धोंडे म्हणाले की, ज्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला माहित नाहीत.त्या गोष्टी
हंबर्डेसर यांच्या लेखामुळे माहिती होतात.आष्टी परिसरातील सर्व जाती धर्मातील
लोकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. चौफेर वाचन, लेखन हा त्यांचा स्थायीभाव
असल्यामुळे सरांचे कोणत्याही विषयावरील लेखन हे वाचनीय असतेह.आजही आष्टी चित्र
दर्शन या साप्ताहिकातील अग्रलेख परत परत वाचावेसे वाटतात.माझ्या शालेय आणि राजकीय
जीवनामध्ये अनंत हंबर्डे सरांचे मार्गदर्शन अनेक वेळा लाभलेले आहे.कधी कधी राजकीय
मतभेद होत असत. पण त्याचा परिणाम रोजच्या व्यवहारावर कधीही जाणवला नाही.एक
बुध्दीप्रामाण्यवादी आणि सिध्दहस्त लेखक म्हणून सरांचा आम्हांला अभिमान वाटतो.
यावेळी नगराध्यक्ष जिया बेग,सुखलाल मुथा,रमजानशेठ तांबोळी,ह.भ.प. दिनकरराव तांदळे,
ह.भ.प.रामदास डोरले,संतोषशेठ मेहेर,बाबुराव अनारसे, संजय मेहेर,गटशिक्षण अधिकारी
सुधाकर यादव,नामदेव राऊत,विठ्ठलराव बन्सोडे,हरिभाऊ मार्कडे, डॉ.अशोक
गांधी,प्राचार्य डॉ.सोपोन निंबोरे, बाळासाहेब बळे,विक्रम पोकळे, बबनराव औटे,कुंडलीक
आमटे महाराज,अनंत चौधरी,बाबासाहेब मुळीक, सुभाष महाडीक,विजय आमटे,पोपटराव घुले,
प्रा.सुभाष रासकर,बबनराव खंडागळे,गोरख सायकड,युनुसशेठ शेख,हरिभाऊ जंजीरे,प्रा.राम
बोडखे,पी.वाय. काळे,आसाराम थोरात ,सीताराम पोकळे,प्रा.अभय शिंदे,अशोकदेवा जोशी,अनिल
बिवरे,मुरलीधर पाचे, बाळासाहेब शिंदे,देवीदास चाळक, नवनाथ तांदळे,पत्रकार उत्तम
बोडखे, रघुनाथ कर्डिले,प्रवीण पोकळे,संतोष सानप,अविशांत कुमकर,राजेंद्र लाड, आकाश
डोंगरे,सोपान गाडे,आदि मान्यवर उपस्थित होते.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
प्रा.सौ.सायली हंबर्डे तर आभार पत्रकार उत्तम बोडखे यांनी मानले.
-------------------------------
0 टिप्पण्या