
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना भावी आयुष्य जगण्याचे शिक्षण देत असतात पिंपळा परिसरातील मुलांसाठी पिंपळेश्वर विद्यालय हे मोठे विद्यापीठ आहे. या शाळेतील सुभाष कुलांगे यांनी या परिसरातील १९ वर्षाच्या आपल्या कार्यकीर्दीत सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम केले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब भिटे यांनी व्यक्त केले.
दि. ३१ ऑगस्ट रोजी सुभाष कुलंगे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले यानिमित्ताने त्यांचा पिंपळेश्वर विद्यालय आणि पिंपळा ग्रामस्थ च्या वतीने सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.त्याचबरोबर संगणक कक्षाचे उद्घाटन व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या निधीतून दिलेल्या पाच लक्ष रुपयांच्या ओपन जिम आणि परसबाग चे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,ह.भ.प.
गुरुवर्य राऊतदादा महाराज,पिंपळा येथील सरपंच सौ. सीमाताई भवर,
बाबासाहेब भिटे,संजय धायगुडे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब भिटे म्हणाले की, श्री कुलांगे सर यांनी सुसंस्कृत आणि हुशार वृत्तीचे विद्यार्थी घडवण्याचं कार्य केले. श्री कुलांगे सर यांनी विद्यालयासाठी व संस्थेसाठी खूप मोठे योगदान दिले.आज त्यांचा सेवापुर्ती सोहळा या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबर संगणकीय कोर्स पूर्ण करून विद्यार्थी संगणक साक्षर होऊन प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडेल अशा प्रकारची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.आ.बाळासाहेब आजबे यांनी विद्यार्थी शारीरिक तंदुरुस्त व्हावेत यासाठी ओपन जिम पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा या ठिकाणी देण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच रामदास शेंडगे,प्राचार्य दानवे,शेकडे सर,यादव सर, ग्रामपंचायत सदस्य विलास खटके, संदीप लिंबोरे, डॉ.संजय खटके,डी.के.शिंदे, माजी सरपंच चंद्रकांत साके,राजेंद्र गाढवे महाराज, युवराज खटके,मुळे मामा,दत्ता विधाते, बापूराव शिंदे,लक्ष्मण भस्मे श्री सचिन धायगुडे राजेंद्र शिंदे,दादा विधाते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विष्णू विधाते यांनी केले तर सूत्रसंचालन आहेर
सर आणि सोनवणे यांनी केले आभार प्रदर्शन श्री जगधने एन.के.यांनी केले.
0 टिप्पण्या