
आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांच्या
वाढदिवसानिमित्त मतदार संघातील नागरिकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंतर्गत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आ.बाळासाहेब आजबे मित्र मंडळ यांच्यावतीने विमा
रक्कम भरून सर्व नागरिकांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सांगण्यात आले . आष्टी, पाटोदा, शिरूर
तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेत पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सर्वसामान्य
नागरिकांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्व नागरिक विमाधारक
व्हावेत या उद्देशाने इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत सर्वसामान्य नागरिकांना थेट
फायदा होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घरोघरी जाऊन सर्वसामान्य नागरिकांचे
फॉर्म भरून घेऊन स्वतः विम्याची रक्कम बँकेत अदा करणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील
लाखो नागरिकांना विमा सुरक्षा मिळणार आहे.पंतप्रधान विमा सुरक्षा योजने बरोबरच
आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप, विमा सुरक्षा कवच व इतर विविध कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते येत्या दोन
दिवसात विमा सुरक्षा योजनेचे फॉर्म घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांचे विमा भरून घेणार
आहे.मतदार संघातील नागरिकांनी सहकार्य करावे असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आणि आ.बाळासाहेब आजबे मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या