Ticker

6/recent/ticker-posts

दैनिक ' झुंजारनेता ' चे अवलोकन करत समाजप्रबोधनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज छायाचित्रकाराला पोज देतात तेंव्हा....

सबंध राज्यभर खेड्यापाड्या,वस्तीसह नगर आणि महानगरामध्ये कानाकोपऱ्यात आपल्या खास विनोदी शैलीने कीर्तनात रंग भरत प्रचंड विनोदी शैलीने खळखळून हसायला लावणाऱ्या सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दैनिक झुंजारनेताच्या अंकाचे मनःपूर्वक अवलोकन केलेच पण छायाचित्रकारालाही मनसोक्त पोज दिली. निमित्त होते आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे..... वाढदिवसाच्या निमित्त ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर आष्टीत आल्यानंतर हजारोंच्या भाविक भक्तांच्या गर्दीने मंडप फुलला होता.इंदुरीकर महाराज यांच्या आगमनानंतर हजारो भाविक भक्तांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. सत्कारमुर्ती लोकनेते भीमराव धोंडे,कीर्तनाचे आयोजनकर्ते इंजि. बाळासाहेब भुकन यांना मंडपातून विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करीत व्यासपीठावर नेले. दरम्यान, इंदुरीकर महाराज काही क्षण भाविक भक्तात विसावले होते.याचवेळी दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी झुंजारनेताचा अंक महाराजांच्या हाती दिला.इंदुरीकर महाराज यांनी विविधांगाने परिपूर्ण आणि त्यातील विशेष बातम्या,दर्जेदार लेखन याचे अवलोकन करत वाहवा करत होते. याचवेळी त्यांनी उपस्थित छायाचित्रकाराला स्वतःहून आपल्या खास शैलीत मानसोक्तपणे पोज दिली ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्या या दिलखुलास मोकळ्या मनाच्या विशेष घटनेने भाविक भक्तही खुश झाले.उत्तम बोडखे यांनी यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.किर्तन सेवेला प्रचंड भाविक भक्तांची गर्दी झाली.दरम्यान,माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक असाच व्दिगुणित व्हावा आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी लाभावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या