
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या
वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी येथील भगवान महाविद्यालयामध्ये
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग तसेच तहसील कार्यालय, आष्टी यांच्या
संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी
अहमदनगर येथील सुरभी ब्लड बँकच्या टीमला निमंत्रित करण्यात आले होते. या शिबिराचे
उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व भारतीय जनता
पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस युवा नेते डॉ. अजय दादा धोंडे व तहसील
कार्यालयाच्या श्रीमती मनीषा बांगर यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, महाविद्यालयाचे इतर
कर्मचारी व विद्यार्थी तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. यावेळी सामाजिक कार्याचे भान असणाऱ्या 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या
रक्तदात्यांमध्ये महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी व तहसीलचे कर्मचारी यांचा
सहभाग होता. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे
कार्यक्रमाधिकारी प्रो. आशोक देवकर, डॉ. सूर्यकांत धोंडे, डॉ. बाळासाहेब गावडे,
क्रीडा विभागाचे डॉ. बापू तोरडमल, डॉ. दीपक टेकाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
त्यांना महाविद्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले. या वाढदिवसाच्या
निमित्ताने महाविद्यालय परिसरामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विभाग प्रमुख
डॉ. प्रल्हाद खेतमाळस व डॉ. शत्रुघ्न करडुळे यांनी वृक्षारोपणाचे नियोजन केले होते.
डॉ. अजय दादा धोंडे, तहसीलदार प्रमोद गायकवाड व प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ या
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान व वृक्षारोपण या दोन्ही
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव
वैद्य, डॉ. आप्पासाहेब टाळके यांच्याबरोबरच महाविद्यालयातील डॉ. रामदास कवडे, डॉ.
नामदेव वाघुले, डॉ. दिगंबर पाटील, डॉ. बाबासाहेब झिने, डॉ. आबासाहेब पोकळे, डॉ.
अनिल हजारे, श्रीमती डॉ. वंदना घोडके, डॉ. बन्शी वाळके, प्रा. विक्रम खेडकर, प्रा.
काकासाहेब सोले, तहसील कार्यालयाचे कर्मचारी श्रीमती मनीषा बांगर, श्री बी.सी.
धारक, श्री राजकुमार पवार, श्री विशाल मोकाशे, दीपक गालफाडे, श्री गारोळे यांनी
विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या