भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या.वर्धापनादिनानिमित्त ओबीसी आयोग दिल्ली सरकार
यांच्यावतीने विधी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आष्टीचे ॲड.रत्नदीप
निकाळजे आणि सौ.प्रज्ञा निकाळजे यांना रविवारी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात
आला. आष्टी येथील प्रसिद्ध वकील ॲड. रत्नदीप निकाळजे यांना उल्लेखनीय कार्यासाठी
राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.निकाळजे यांच्या उल्लेखनीय
कार्याची दखल ओबीसी आयोग,नवी दिल्ली सरकार यांच्यावतीने घेण्यात आली.रविवार दि. १३



ऑगस्ट २०२३ सायंकाळी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया,रफी मार्ग,नवी दिल्ली येथे भव्य
समारंभामध्ये ओबीसी कमिशनचे चेअरमन जगदीश यादव आणि सल्लागार अनुप चावला यांच्या
हस्ते ॲड.रत्नदीप निकाळजे विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यसाठी राष्ट्रीय एकता
पुरस्काराने सन्मानित केले आहे.रत्नदीप निकाळजे यांचा नुकताच ऑल इंडिया ॲडव्होकेट्स
ॲन्ड असोसिएशन्स नवी दिल्ली यांच्यातर्फे आष्टीचे प्रसिद्ध वकील तथा आष्टी वकील
संघाचे माजी अध्यक्ष ॲड. रत्नदीप निकाळजे यांना सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन
पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या वकिलीच्या शताब्दीनिमित्त ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेट्स ॲन्ड
असोसिएशनतर्फे उत्कृष्ट वकिली करणाऱ्या देशातील १०१ वकिलांना सोल्जर ऑफ
कॉन्स्टिट्यूशन फेडरेशन ऑफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराबद्दल
सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या