Ticker

6/recent/ticker-posts

५० कोटी रु चा निधी रस्ता कामांसाठी मिळताच कडा ते देवळाली रस्त्यासाठी १५ कोटी रुपये टाकले... आ.सुरेश धस..

आष्टी तालुक्यातील महत्वाचा आणि दोन जिल्ह्याला जोडणारा पाथर्डी सरहद्द आल्हनवाडी, देवळाली,पिंपरी,दादेगाव,डोंगरगण,कडा या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली होती.या परिसरातील शेतकरी, व्यापारी यांची फार मोठी अडचण होती.त्यामुळे आपण ५० कोटी रू निधी मिळताच प्राधान्याने या कडा ते देवळाली रस्त्यासाठी १५ कोटी रु टाकले असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले. देवळाली ते कडा या रस्ता कामाचा शुभारंभ त्यांनी पिंपरी चौक याठिकाणी केला.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीड जि.प.चे माजी सदस्य रावसाहेब शिरसाट हे होते.पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,अर्थसंकल्पीय रस्ते कामांमध्ये ५० कोटी रु.मंजूर झाले होते. त्यापैकी १५ कोटी रु.किंमतीचा असलेला देवळाली ते कडा या एकाच रस्त्यासाठी आपण दिले असून उर्वरित मतदार संघासाठी ३५ कोटी रु. दिले आहेत कारण गेल्या अनेक वर्षापासून कडा,डोंगरगण, दादेगाव,पिंपरी, देवळाली, खरकटवाडी येथील ग्रामस्थांची हा रस्ता दर्जेदार प्रतीचा व्हावा अशी मागणी होती त्यानुसार आज हा शुभारंभ होत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे.देवळाली ते कडा या रस्त्यावर १० पूल मोठे आणि २ लहान पूल होणार असून ३.७५ मीटर एवढा रुंदीचा असून साईड पट्ट्या बाजूने नाली बांधकाम होणार असल्यामुळे या रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे रुंदीचा व्हावा यासाठी कोणी अतिक्रमण केले असेल तर त्याने आपणहून काढून घ्यावे आणि हा दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी शासनाला सहकार्य करावे. तसेच या १७ कि.मी.अंतरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येत्या महिन्या दीड महिन्यात आपापल्या पाईपलाईन करायच्या असतील तर रस्ता खोदून पाईप टाकून घ्यावेत एकदा दर्जेदार रस्ता झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हा रस्ता खोदल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सांगून लोकशाही अत्यंत स्वस्त झाल्याचे सांगत कोणीही यावे रस्ता खोदून पाईप टाकावेत अशी परिस्थिती यापुढे होऊ नये अशी तंबी देखील त्यांनी यावेळी दिली.परिसरातील नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवावे आणि दर्जेदार काम करून घ्यावे असे सांगून अहमदनगरची बेस्ट कन्स्ट्रक्शन्स ही चांगली कंपनी आहे.त्यांनी यापूर्वी दर्जेदार कामे केली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी यावेळी हे काम मुदतीपूर्वी म्हणजे दि.२८ फेब्रुवारी २०२४ पूर्वी करून दाखवावे असे आवाहन केले. या रस्त्याबरोबरच गंगादेवी ते अरणविहिरा ४.५० किलोमीटर दादेगाव ते इमनगाव देवळाली ते वेलतूरी, चिंचेवाडी ते अरणविहीरा,या रस्त्याची कामे देखील आपण लवकरच मार्गी लावणार आहोत असे सांगून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत कामांसंबंधी दर्जेदार कामे करून लोकांना पिण्याचे पाणी मिळेल असे काम करावे असे सांगून पाण्याऐवजी नळ योजनेतून हवा बाहेर आल्यास जनतेकडून आम्हाला देखील हवा खावी लागेल अशी मिस्कील टिपणी त्यांनी केली.केंद्र शासनाद्वारे आरोग्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येत असून प्रत्येक नागरिकांनी आपले आयुष्यमान भारत अंतर्गत आपले कार्ड काढून घ्यावे कारण ५ लाख रुपये पर्यंतच्या शस्त्रक्रिया आजारावरील उपचार मोफत करण्यात येणार असल्यामुळे गावोगावातील कार्यकर्त्यांनी याबाबत लक्ष घालून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण मार्कंडे यांनी या रस्ता कामाचे ३ महिन्यात अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता घेतली आहे आ. सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकर मंजूर होऊन शुभारंभ आज होत आहे असे सांगितले या यावेळी कडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन विष्णुपंत चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शिरसाट, दूध संघाचे अध्यक्ष संजय गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी महानवर, धामणगाव येथील सरपंच श्रीमती संजना गाढवे यांचे चिरंजीव मनोज गाढवे,कडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय ढोबळे, अशोक लगड, राजेंद्र दहातोंडे, कडा ग्रा.पं.चे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, राजाभाऊ कर्डिले, रमेश तांदळे, दत्ता चव्हाण, देवळालीचे सरपंच पोपटाआबा शेकडे, बाबासाहेब मुळीक, दिगंबर घोडके,चांगदेव शेळके,अशोक घुमरे, युवराज वायभासे,सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता शिवाजी सानप,शाखा अभियंता प्रदीप बादाडे ,घाटापिंपरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.भागचंद झांजे यांनी अत्यंत बहारदारपणे केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या