माजी आ.साहेबराव दरेकर यांचे नातू व राजाभाऊ दरेकर यांचे सुपुत्र युवानेते ॠषिकेश दरेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी निवड केली आहे.आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कामधेनू मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली.यावेळी निवडीची घोषणा करुन सत्कार करण्यात आला.राष्ट्रवादीला आष्टी तालुक्यामध्ये माजी आ.साहेबराव दरेकर यांच्यासारखे अनुभवी आणि परखड नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून आता पुन्हा राष्ट्रवादी प्रबळ होणार असल्याचे बोलले जात आहे. दरेकर यांचे नातू ॠषिकेश दरेकर पुढे आले आहेत. यामुळे आता नविन युवकांची फळीही ॠषिकेशच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे.दरेकर म्हणाले की,येणाऱ्या काळात आपण युवकांची मोठी फळी निर्माण करणार आहोत.माझे आजोबा दरेकरनानांच्या माध्यमातून आपण राष्ट्रवादीचे चांगले कार्य करणार असे सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष संदिपभैय्या क्षीरसागर,युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख,साहेबराव दरेकर,परमेश्वर शेळके,बापूसाहेब डोके,माजी आ.सय्यद सलीम,रविंद्र ढोबळे,रामभाऊ खाडे आदि सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या