कोणताही कलाकार हा स्वछंदी आणि मुक्त स्वभावाचाच
असतो.डिझाईनर आकाश डोंगरे हाही त्यातीलच एक. बोडखे प्रेसमध्ये हा फक्त डिझाईनरच
नाही तर दत्ताभाऊ बोडखे यांचा विश्वासु साथीदार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार
नाही.अत्यंत वेगवान बोटांची हालचाल..त्यातुनच उत्कृष्ट डिझाईन. मनोधैर्य ही डिझाईनर
आकाश डोंगरे यांची प्रचंड शक्ती आहे.एक धडपडी व्यक्तीमत्व.संगणकाचे कि -बोर्ड
म्हणजे एखाद्या वैमानिकाच्या हातातील विमान होय.डोळे झाकुन कि-बोर्ड हाताळत असताना
त्याच्यासमोर किंवा शेजारी बसलेल्या माणसाचे मन जिंकुन घेणारा आकाश आहे. कामात
अत्यंत चपलखपणा.इग्रंजी भाषेवर कमांड असलेला आकाश पदवीधर झाला आणि ग्राफिक्स
क्षेत्रात आला.युवा उद्योजक दत्ताभाऊ बोडखे हा मित्र लाभला.दोघांमध्ये विचार विनिमय
होऊन बोडखे फ्लेक्स ॲन्ड आॕफसेट प्रेस सुरु केली.पाच वर्षात आपल्या व्यवसायाच्या
माध्यमातून नावलौकिक आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.अल्पावधीत आपल्या
गुणवत्तेच्या बळावर आष्टी तालुक्यात वेगळे वैशिष्ठ्यपूर्ण स्थान निर्माण केलेल्या
बोडखे ऑफसेट आणि प्रिंटिंग प्रेस या संस्थेने यशस्वी पल्ला गाठला आहे. सहाव्या
वर्षात नुकतेच पदार्पण करताना आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी
प्रेसमध्ये येऊन आकाश डोंगरेचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या
आहेत.आकाश डोंगरे यांच्या संयुक्त बुद्धीकौशल्य आणि परिश्रमातून रंगीबेरंगी दुनियेत
प्रचार आणि प्रसार माध्यमांमध्ये गुणवत्तेचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.त्याबद्दल
अनेकांनी कौतुक केले.
रंगीबेरंगी दुनियाचा जादूगार!
-----------------
पाच वर्षांमध्ये बोडखे प्रेसच्या माध्यमातून
डिजिटल बोर्ड आणि छपाईच्या रंगीबेरंगी दुनियेत आपले वेगळे कौशल्य वापरून सण,समारंभ,
उत्सव,विवाह,कार्यक्रम यामध्ये चैतन्य निर्माण करण्यात आपला वाटा उचलला
आहे.त्यामुळेच अनेकांनी आकाशच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
ग्राफिक्स
क्षेत्रात'नंबर वन
------------
'कला हेच जीवन आहे!'
कलेला ह्रदयस्थानी ठेवून त्यात जीव ओतून काम केल्यास कलेतून जिवंतपणा येतो हे
वास्तव आहे आणि हे वास्तव प्रत्यक्षात आणण्याचं कार्य आष्टी तालुक्यातील आकाश
डोंगरे नावाच्या युवकाने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.आष्टी तालुक्यातील
पत्रकारांना जाहिरातीचे डिझाईन अवघ्या काही मिनीटात तयार करुन देतो.यामुळे तो सर्व
पत्रकारांचा लाडका आहे. प्रामाणिकपणाच माणसाला उच्चपदापर्यत घेऊन जातो.या विचारावर
आकाश डोंगरे चालत आहे.आकाशचे गतिमान,दर्जेदार आणि कौतुकास पात्र असेच काम करून
भविष्य घडविणे हे त्याचे ब्रीद आहे.तळमळीनं काम करणारा आकाश हा डिझाईनर आहे.
,प्रामाणिकपणा आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट कामावर निष्ठा असणारा माणूससच अशा
व्यक्तीला वारसा अथवा इतर गोष्टींची उणीव भासत नाही.आष्टी तालुक्यातील मातकुळीच्या
एका शेतकऱ्याचा मुलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाची जबाबदारी
यशस्वीरित्या पेलून कलेच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.हाच
कष्टाचा वारसा घेऊन निघालेल्या आकाशने आपले कला क्षेत्रात नाव कमविलेले आहे.
ग्राफिक्स क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती झाली आहे.झगमगत्या आणि डिजिटल जगात उजळपणा
हा आपल्या कामातुन दिसत असतो.आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील परिपुर्ण
ज्ञान संपादन करुन आपले वेगळेपण व आपला नावलौकिक वाढविला पाहिजे.आकाश डोंगरे हा
एका खेड्यातील तरुण.आकाश डोंगरे हा नामवंत कलावंत आहे.ग्राफिक्स जगात आपल्याला
करिअर करायचे हे ध्येय मनाशी बाळगुन डिजाईन क्षेत्रात १० वर्षापुर्वी पदार्पण केले
आहे. आष्टीचे युवा उद्योजक दत्ताभाऊ बोडखे यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित
करुन आष्टीत ग्राफिक्स क्षेत्रात मोठे नाव केले आहे. आकाशकडे कल्पकतेची एक दृष्टी
आहे.मेहनत,जिध्द आणि आत्मविश्वास यातुन आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करता येते.हे
आकाशने दाखवुन दिले आहे.कलाकार हा कधीच उपाशी राहु शकत नाही आणि कधीच अपयशी होत
नाही.आकाश डोंगरे हा आज आष्टी शहरात एक नामवंत डिजाईनर म्हणुन चर्चेत आहे.
प्रगतीसाठी व नावलौकिक मिळविण्यासाठी कष्ट करावे लागते. कलेचा गर्व न ठेवता सतत
शिकत राहणारा माणुसच आणखी मोठा होत असतो.जो दुसऱ्यांना मान सन्मान देतो तोच मोठा
माणुस होतो असा निसर्ग नियम आहे.आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील आकाश लक्ष्मण
डोंगरे या तरूणाने आपला वडीलबंधु नितीन डोंगरे यालाच कला क्षेत्रात गुरु मानले आहे.
सोशल मिडीयातील डिजाईन,डीटीपी आदि संगणकाच्या माध्यमातुन एक उत्कृष्ट डिजाईनर
म्हणुन नावलौकिक मिळविला आहे.१० वर्षात आष्टी भागातील एक नामांकीत डिजाईनर झाला
आहे.युवाउद्योजक दत्ताभाऊ बोडखे यांच्या बोडखे प्रेस या प्रेसमध्ये आकाश डोंगरे हा
तरुण उत्कृष्टपणे डिजाईनर म्हणुन कार्यरत आहे. आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील
शेतकरी कुटुंबात दि.२२ ऑगस्ट १९९७ मध्ये जन्मलेला आकाश डोंगरे. प्रतिकुल
परिस्थितीतून शिक्षण घेवून ग्राफिक्स क्षेत्रात आज कार्यरत आहे.शालेय शिक्षण
जि.प.प्रशाला मातकुळी व माध्यमिक शिक्षण श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी येथे तर आष्टी
येथील भगवान महाविद्यालयात बारावी कला शाखापर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर
बहिस्त विद्यार्थीं राहुन पदवी घेतली.शिक्षण घेत असतानाच आकाशने जामखेड आणि
अहमदनगर येथे आवडीचे क्षेत्र असलेल्या ग्राफीक्स या क्षेत्रात पदार्पण
केले.प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी सोबत घेवून आष्टी येथे आकाश डोंगरे हे ग्राफिक्स
दुनियात प्रभावीपणे काम करीत आहे.आकाश डोंगरे याने अंत्यत प्रतिकुल परिस्थितीमध्ये
आपल्या कुंटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलुन कलेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा
ठसा उमटविला.कलेचा प्रवास आकाशला नामांकीत कलावंत इथपर्यत घेऊन आला आहे.डिझाईनर
आकाश डोंगरे यांना वाढदिवसाच्या झुंजारनेता परिवार आणि बोडखे प्रेसचे

वतीने हार्दिक शुभेच्छा..
0 टिप्पण्या