Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत राधिका लॉजवर वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा, दोन पिडीतांची सुटका

आष्टी शहराजवळील राधिका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. यावेळी दोन पिडीतांची सुटका करण्यात आली.याप्रकरणी लॉज चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई रात्री करण्यात आली.नगर जामखेड महामार्गावरील आष्टी तहसिल कार्यालयासमोर असणाऱ्या राधिका नावाचे लॉजिंगवर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून तेथे लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर गुरुवार दि.२४ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी आपल्या पथकासह छापा मारला असता याठीकाणी सांगली, कर्नाटक,बॅगलोर येथून मुली आणून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यासाय चालवताना आढळून आला.येथील दोन पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली. मालक लहु सानप (रा.कासेवाडी) यांच्यावर कलम ३,४,५,६,७ (२) क नुसार आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे करत आहेत.ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख,सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोसावी,पो.कॉ सचिन पवळ,पो.शि. एम.एस.शेख,पो.शि. दादासाहेब भगत आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या