Ticker

6/recent/ticker-posts

विविध मागण्यांचे ग्रामपंचायत कामगार युनियन सोमवारी बीडीओंना निवेदन देणार ------ कॉ.सुरेश निकाळजे

आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार, कर्मचारी यांचे राहणीमान भात्ता, जी.पी.एफ.चा ग्रामपंचायत तथा सरकारचा ८.३३ टक्के हिस्सा ताबडतोब देण्यात यावा. या मागणीसाठी यासाठी सोमवार दि.२८ आगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ.सुरेश निकाळजे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुंबई दि.२८ नोव्हेंबर २०१६ नुसार ग्रामपंचायत कामगारांना राहणीमान भत्ता लागू केला आहे. आजपर्यंत काही ठराविकच कामगारांना तोंड पाहून आणि आपला नातेवाईक आहे हे पाहून भत्ता दिला जात आहे असा आरोप केला. खेड्यागावांतील ग्रामपंचायत कामगारांना आजपर्यंत म्हणजे सात वर्षापासून जवळपास ६० ते ७० हजार रूपये भत्ता थकीत आहे. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ,सरपंच आपल्या कामगारांना भत्यापासून जाणुन-बुजून वंचित ठेवले जात आहे. वसुली नाही हे कारण सांगून, वसुली होऊनसुध्दा राजकीय पुढऱ्याच्या दबावाला बळी पडून ग्रामपंचायत कामगारांवर मोठा अन्याय करीत आहेत.महाराष्ट्र शासन परीपत्रक २१ ग्रामविकास विभाग यांच्या मार्फत दि. ८ जानेवारी १९८७ कलम १९६१ नुसार भविष्य निवार्ह निधीप्रमाणे ग्रामपंचायत कामगाराच्या पगारातून ८.३३ टक्के रक्कम कपात केली जाते परंतू ग्रामपंचायत आबोलीत सरकारचा जी.पी.एफ.च्या खात्यामध्ये हिस्सा आजपर्यंत जमा झाला नाही. टाकण्यात आला नाही. याचे भान कामगाराला राहिले नाही. नुसता पगार आणि १० टक्के आरक्षण यामध्ये ग्रामपंचायत कामगार खुष आहे. ग्रामपंचायत कामगारांनो १० टक्के अरक्षणमध्ये सर्वच कामगार जाणार नाहीत. जे जातील ते जातील. जेव्हा सरकारचा आदेश येईल तेव्हा सरकार जिल्हा परिषदला भरती करील.तुम्ही उर्वरीत कामगारांनो हक्काचा राहणीमान भत्तापासून आज लाखे रूपये जी.पी.एफ.च्या हिस्सापासून वंचित राहू नका.जी.पी.एफ.हिस्सा व राहणीमान भत्ता आपल्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाही. अशी सुरवात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून करीत आहोत.त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी.४५११ या संघटनेने दिलेली बातमी खोटी असून त्यांच्यावर जिल्हा बीड प्रत्येक तालुक्यातील कामगारांनी १९ महिन्याच्या ईशा-यावर विश्वास ठेऊ नये. दि.२८ आगस्ट रोजी सोमवारी आष्टी पंचायत समितीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती आष्टी यांना निवेदन देणार आहोत. सर्वानी उपस्थित राहावे असे अहवान जिल्हाध्यक्ष कॉ.सुरेश निकाळजे, सचिव कॉ. नामदेव चव्हाण, कल्याण साठे, शिवाजी कांबळे, शेख हमीद केज तसेच कॉ.गोरखराव पिंगळे, कॉ.भागवत वंजारे शिरूर कासार व मधुकर कर्डीले, दिपक खरात, अनिल टपाल, शेख अशीफ, संजय काकडे, बाबासाहेब काकडे, संजय माळी, शेख याशीन, बाळू गजघाट,भाऊसाहेब खंडागळे, गोकूळ बोराडे, अनिल राऊत, सुरेश गायकवाड, नागनाथ पवार, गोरख खेत्रे, शिवाजी महारनवर, सोमनाथ राजगुरू, हौसराव आंधळे, दत्तु देसाई, विकी गव्हाणे, ज्ञानदेव महाजन आदी सर्व आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांनी वेळेवर सकाळी १० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या