शोध पत्रकारिता कौतुकास्पद- मकरंद अनासपुरे मनुष्य जीवनामध्ये दातृत्व असले
पाहिजे;किंबहुना इतरांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संवेदनशीलता हवी. सुसंवाद
तयार करायलाच हवा. कुठल्याही मनुष्याने वाद नको तर सुसंवादातून आनंदी जीवन जगायला
शिकले पाहिजे!'

अशी अपेक्षा मराठवाड्याचे भूमिपुत्र महाराष्ट्रातील ज्येष्ठ गुणी
विनोदी अभिनेते कलावंत मकरंद अनासपुरे यांनी माध्यम प्रतिनिधींची संवाद साधताना
व्यक्त केली. शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशील पारगाव
येथे डॉ.तुकाराम नेहरकर यांचे वडील कै.भानुदास नाथा नेहरकर (मुकदम) यांच्या
पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैचारिक संवाद साधण्यासाठी आले असताना विविध माध्यम
प्रतिनिधींशी त्यांनी आपला अल्पसा संवाद साधला. विविध प्रश्नांना अत्यंत मोकळेपणाने
उत्तर देत हसतमुखाने त्यांनी समाजातील विविध घटनांवर मनसोक्त प्रतिक्रिया दिल्या.
यावेळी युवक तसेच माध्यम क्षेत्रातील रसिक जणांबरोबर फोटोसेशन केले.त्यांच्या
समवेत सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. यावेळी बीड जिल्ह्याचे प्रेम पाहून
त्यांनी धन्यवाद दिले.मानवी जीवनासाठी आवश्यक असलेला आणि समाज उपयोगी वैचारिक
संवाद साधताना त्यांनी युवकांना ज्येष्ठ नागरिक तसेच शिक्षण सामाजिक सांस्कृतिक
वैचारिक आदीसह क्षेत्राला स्पर्श करत मोलाचा संदेश दिला.यावेळी ज्येष्ठ लेखक
निवेदक प्रा.बिभिषण
चाटे,पत्रकार अनिल गायकवाड, अविशांत कुमकर,आजिनाथ शिरसाट आदी
सह उपस्थित होते. ----------------------------------------
0 टिप्पण्या