Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सौभाग्यवती सविताताईनी आजबे यांनी पतीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करुन दिल्या शुभेच्छा...

आष्टी विधानसभा मतदार संघांमध्ये यावर्षी अद्यापपर्यंत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळी स्थिती दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसापूर्वीच आ.बाळासाहेब आजबे यांनी आपण वाढदिवसानिमित्त हारतुरे,फेटा स्वीकारणार नाहीत.कार्यकर्त्यांनी फक्त भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा द्याव्यात.कुठलाही मोठा उपक्रम न करता कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाने आणि साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा असे आवाहन केले होते. त्याला आज कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला. सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला.आ.बाळासाहेब आजबे यांनी कुठलाही हार तुरे फेटा सत्कार न स्वीकारता करता फक्त भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा स्वीकारल्या तर आ. बाळासाहेब आजबे यांच्या सौभाग्यवती सविता आजबे यांनी शिराळ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः रक्तदान करून आमदारसाहेब यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.सामाजिक बांधिलकी जपण्याचा सर्व कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.आ.बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी, पाटोदा,शिरूर तालुक्यामध्ये ठीकठिकाणी रक्तदान शिबिर,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मतदार संघातील सर्व जनतेचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा कवच काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.आ.बाळासाहेब आजबे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भेटण्यासाठी न येता गावामध्येच सामाजिक उपक्रम साध्यापद्धतीने राबवावेत गरजू व्यक्तींना मदत करून वाढदिवस साजरा करावा त्याच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा आहेत.त्यामुळे साध्या पद्धतीने हा वाढदिवस आ. आजबे यांच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला.कुठल्याही प्रकारचा सत्कार त्यांनी स्वीकारला नाही. चौकट -------- आ.बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावामध्ये कार्यकर्तेच्यावतीने वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आ.आजबे यांच्या पत्नी सविताताई आजबे यांनी रक्तदान करत आ. साहेबांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या