Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीच्या 'साहित्य' विश्वातील 'मुकुटमणी'- अनंत हंबर्डे सर!

विशेष लेख उत्तम बोडखे,आष्टी. पेरेल तेच उगवते.आपल्या कौटुंबिक अत्यंत पवित्र रसाळ आणि अध्यात्म वाणीतून कुटुंबाची योग्य दिशा आणि वाटचाल करणारे... हंबर्डे परिवारात अनंत हंबर्डे सर यांच्या रूपाने एका साहित्यिकाच्या माध्यमातून नवी पेरणी झालेली आहे.राजय, सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,
वैचारिक, आर्थिक, सांस्कृतिक आदिसह विविध क्षेत्रात आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण लेखणीने नवी क्षितिजे निर्माण करणारे माजी उपप्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक अनंत हंबर्डे सर हे आष्टीच्या साहित्य विश्वातील मुकुटमणी म्हणून शोभून दिसतात! पत्रकारितेच्या क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ प्रभावशाली,गौरवशाली,निष्कलंक अशी कारकिर्द गाजवत नव्या पिढीतील अनेक पत्रकारांना अनंत हंबर्डे सर यांनी घडविले.आज बुधवार दि.३० आगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आष्टीकर आजी,माजी आमदारांच्या,प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत आणि शिष्यगणांच्या समोर " जीवन गौरव " पुरस्काराने सन्मानित होत आहेत.प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात ही त्यांनी शब्दांना आयुष्य मानले.आपल्या मोत्या समान अक्षरांच्या माध्यमातून शब्द जोडून त्यांनी समाज आणि साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू केल्या! शेतकरी,कामगार,युवक यांच्या विषयाला हात घालत त्यांनी आपली लेखणी समृद्ध केली.शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण क्षेत्रात आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून पेशा स्वीकारला.नंतर शिक्षण क्षेत्रासाठी हंबर्डे सर एक नूतन मेजवानी होते.प्राध्यापक, उपप्राचार्य म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका आणि कर्तव्य हजारो, लाखो शिक्षणप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरले.त्यांनी दिलेली व्याख्याने,लिहिलेली हजारो लेख, भाषणे हे कायमस्वरूपी समाज परिवर्तन,संस्कार,ऐक्य चारित्र्य बंधुत्व सर्वधर्मसमभाव,एकता सहिष्णुता या मूल्यांसाठी उपयुक्त ठरतील.मराठी सारस्वत सिंधूमधले हंबर्डे सर हे एक बिंदू आहेत. साहित्यिकांच्या दिंडीतील खांदी पताका गळ्यात माळ अन् हाती टाळ असलेला अनवाणी फिरणारे वारकरी आहेत.सुमारे ५५ वर्षापासून अक्षरांचे शब्द जुळवीत आहे.सुरवातीला हंबर्डे सर यांनी काही कथा लिहिल्या, " एल्गार"नावांचे नाटक लिहिले,कविता लिहिल्या,उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नामदार नरेंद्र चपळगावकर यांनी हंबर्डे सर यांना लेख लिहिण्याचे सांगितले.तिथून पुढे जसे जमले तसे ते लेख लिहित राहिले.बीडचे मुख्य दैनिक झुंजारनेता,चंपावतीपत्र,सुराज्य, प्रजापत्र,संकेत,पार्श्वभूमी या वृत्तपत्राने हंबर्डे सर यांचे शेकडो लेख छापले पंचधारा,प्रतिष्ठाण, महानुभाव,ज्ञानोदय,सकाळ, लोकसत्ता,लोकमत या वृत्तपत्रांनेही प्रासंगिक लेख आवर्जुन छापले सुमारे अडीच हजार लेख प्रसिध्द झालेले आहेत. दैनिक मराठवाडा हे यक्ष हंबर्डे सर यांचे उर्जास्तोत्र होते.विचार प्रवर्तीय लेख लिहिणाऱ्या शिवरामपंत परांपजे ,कोल्हाटकर, माडखोलकर,महाजनी,आगरकर,आचार्य अत्रे,परूळेकर,कृष्णाजी खाडीलकर,अनंत भालेराव आदी संपादकांच्या मांदियाळीचा हंबर्डे सर हे एक भारवाहक आहेत.सर्वोत्तम गावरस्कर,अशोक देशमुख,सुनिल क्षीरसागर यांनी विचारवंत हंबर्डे सर यांचे लेखांचा संग्रह प्रकाशित करण्याचा विचार, वारंवार बोलून दाखविला होता.नामदेव राऊत आणि मी काही लेख हंबर्डे सर यांच्याकडुन घेतले.त्याचे प्रकाशन स्वयंस्फूर्तपणे केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब आणि केंद्रीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी १९९४ साली महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र' पुरस्कार अनंत हंबर्डे. सर यांना मिळाला आहे.आष्टी तालुक्यातील लोकांनी हंबर्डे सर यांना अखंड प्रेम दिलेले आहे.हंबर्डे सर यांनी तालुक्यातील नावलौकिक मिळविलेल्या २७ मान्यवरांचे जीवन चरित्र सांगणारे 'नक्षत्रांचे लेणे'हे पुस्तक लिहले आहे."आष्टी भुषण " हा पुरस्कार आष्टीकरांनी १० वर्षांपुर्वी दिला.माजी आमदार भीमराव धोंडे यांनी " गंगाई - बाबाजी राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार दिलेला आहे.संतोष मानुरकर यांनी दोन वर्षांपूर्वी बीड शहरात "जीवन गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.आष्टी तालुका पत्रकार संघ,तालुका युवा पत्रकार संघाने अनंत हंबर्डे सर यांचा " आदर्श पत्रकार"पुरस्कार दिलेला आहे. साहित्यिक,विचारवंत,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सर यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.मला भाषण करण्याची पहिली संधी दिली ती म्हणजे अनंत हंबर्डे यांनीच..मी त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारिता क्षेत्रात आलो आहे.विवेकवादाची मशाल पेटती ठेवण्यासाठी अनंत हंबर्डे यांच्या विचारांची आवश्यकता आहे जेष्ठ विचारवंत,साहित्यिक तथा जेष्ठ पञकार,संपादक अनंत हंबर्डे यांचे लेखणीतून साकारलेल्या "अनंत तरंग" या अग्रलेख संग्रह अलिकडेच प्रफुल्ल सहस्रबुद्धे आणि आम्ही प्रकाशित केला. " जीवन गौरव " पुरस्काराने होणार सन्मानित ......... ज्येष्ठ पत्रकार,प्रसिद्ध साहित्यिक,गुरुवर्य अनंत हंबर्डे यांचा आज बुधवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथील पंचायत समिती सभागृहात आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गहीनाथगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली "जीवन गौरव " समारंभ तथा सहस्त्रदर्शन सोहळा थाटात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक श्रीधरपंत सहस्रबुद्धे,संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, वाल्मीकतात्या निकाळजे,नगराध्यक्ष जिया बेग, सुखलाल मुथा,डॉ.अशोक गांधी,नामदेव राऊत,समाजसेवक विजय गोल्हार,बाबुराव अनारसे,श्रीमती शाहीन पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गुरुवर्य, ज्येष्ठ पत्रकार,अनंत हंबर्डे यांच्या जीवन गौरव समारंभ तथा सहस्त्र दर्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीचे बाबुशेठ भंडारी, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,कवी सय्यद अल्लाउद्दीन,पत्रकार उत्तम बोडखे,शंकर देशमुख,हरिभाऊ मार्कंडे,तानाजीबापू जंजिरे, बाबासाहेब पिसोरे,बबनराव औटे आदि परिश्रम घेत आहेत.आज अशा या शिक्षण समाज, संस्कृती,लेखन,पत्रकारिता आदि सह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या लेखणीचा धबधबा निर्माण केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक माजी उपप्राचार्य,कवी,लेखक, ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सरांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने आनंदी सुखी निरोगी जीवनासाठी अनंत शुभेच्छा..! -- उत्तम बोडखे,आष्टी. -----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या