Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांचा " जीवन गौरव " पुरस्कार देऊन होणार गौरव

                         
ज्येष्ठ पत्रकार,प्रसिद्ध साहित्यिक,गुरुवर्य अनंत हंबर्डे यांचा बुधवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथील पंचायत समिती सभागृहात आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गहीनाथगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली " जीवन गौरव " समारंभ तथा सहस्त्रदर्शन सोहळा थाटात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक श्रीधरपंत सहस्रबुद्धे,संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे,वाल्मीकतात्या निकाळजे, नगराध्यक्ष जिया बेग,सुखलाल मुथा,डॉ.अशोक गांधी,नामदेव राऊत, समाजसेवक विजय गोल्हार,बाबुराव अनारसे,श्रीमती शाहीन पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.गुरुवर्य,ज्येष्ठ पत्रकार,अनंत हंबर्डे यांच्या जीवन गौरव समारंभ तथा सहस्त्र दर्शन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे संयोजक समितीचे बाबुशेठ भंडारी ,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,कवी सय्यद अल्लाउद्दीन,पत्रकार उत्तम बोडखे,शंकर देशमुख,हरिभाऊ मार्कंडे,तानाजीबापू जंजिरे,
बाबासाहेब पिसोरे,बबनराव औटे यांनी आवाहन केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या