आष्टी तालुक्यातील जिजाई उद्योग समूहाचे संचालक बाबूभैय्या गर्जे यांचा आष्टी
तालुका पत्रकार संघाच्यावतीने आ.सुरेशधस यांच्या हस्तेआज सत्कार समारंभाचे आयोजन
करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा.पत्रकार भवन लाहोटी
प्रेसशेजारी आष्टी याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याविषयी अधिक
माहिती देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद ढोबळे यांनी माहिती देताना
सांगितले की, पूर्वाश्रमीचे "बीड चौफेर" या दैनिकाचे संपादक आणि जिजाई मसाला उद्योग
समूहाचे संचालक बाबूभैय्या गर्जे यांनी अल्पावधीमध्ये आपल्या जिजाई मसाल्याचे भारत
देशासह अन्य देशांमध्ये हा मसाला पाठवत आहेत. अल्पावधीतच त्यांनी मिळवलेल्या या
यशाबद्दल श्री.बाबुभैया गर्जे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बेरोजगार युवकांनी
उद्योजकेकडे वळावे यासाठी हा त्यांच्या सत्कार समारंभाचा उद्देश असल्याचे त्यांनी
शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या