Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे आदिनाथ औटे संगीत कलागौरव पुरस्काराने सन्मानित

आष्टी... आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे पोखरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले संगीत शिक्षक आदिनाथ बाळकृष्ण औटे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांनी ग्वालियर घराण्याची गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या १५० व्या.जयंती दिनी मुंबईत सन्मानित केले आहे.अखिल भारतात शास्त्रीय संगीतात अमूल्य योगदान असलेल्या १५१ कलाकारांना महापहोपाध्याय,संगीत रत्न व संगीत कला गौरव असा गांधर्व महाविद्यालयाचे कार्यकारी मंडळ व नवी मुंबई वाशीचे आयुक्त यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला. आष्टीसारख्या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताची शाखा नादब्रह्म संगीत विद्यालय नावाने आदिनाथ आवटे यांनी २५ वर्षांपूर्वी माजी आमदार भीमराव धोंडे आणि त्यांचे संगीतातील गुरुवर्य सोपान काका माने मिरजगावकर व ह.भ.प.बलभीमराव खिळे कानडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९९४ साली आष्टीच्या भाजीमंडईमध्ये शास्त्रीय संगीताची शाळा सुरू केली.आजअखेर तालुक्यातील व परिसरातील असंख्य विद्यार्थी संगीत विशारद पूर्ण गायन हार्मोनियम वादन तबला वादन अशा वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत होऊन शास्त्रीय संगीत कलेचे सादरीकरण करत आहेत आदिनाथ औटे यांनी संगीत विशारद शिक्षण पूर्ण केल्यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीत शिक्षक केंद्र संचालक व परीक्षक म्हणून महाराष्ट्रभर कार्य सुरू आहे.पंडित पलुस्कारांनी सुरू केलेल्या अखिल भारतातील सर्व शास्त्रीय संगीताचे कार्य मंडळाच्या आदेशान्वये आज तगायत त्यांनी सुरू ठेवलेले आहे या प्रामाणिक कार्याचे फळ म्हणून गांधर्व महाविद्यालयाने हा संगीत कला गौरव पुरस्कार दिला असावा असे परिसरातील शिष्यवर्गातून बोलले जाते आहे या पुरस्कारानिमित्त शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे,यशवंतराव चव्हाण विद्यालयाची प्राचार्य नारायण गवारे,सर्व शिक्षक स्टाफ ह.भ.प‌.दिनकरराव तांदळे महाराज,दूध संघाचे माजी चेअरमन आदिनाथ सानप,पांडुरंग गर्जे, बलभीमराव सुंबरे,वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,जेष्ठ कार्यकर्ते,माऊली सेवा मंडळातील भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्ग रवींद्र ढोले, शशिकांत खाडे, विशाल चव्हाण, साबळे मामा, दीपक निकाळजे, त्यांचे सर्व कार्यकर्ते व क्लास मधील विद्यार्थी, बहुसंख्य पालक वर्गाने या पुरस्कारानिमित्त अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या