Ticker

6/recent/ticker-posts

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आज घाटशिळ पारगांवात

मराठवाड्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ मराठी चित्रपट क्षेत्रातील गुणी अभिनेते विनोदी कलावंत मकरंद अनासपुरे हे आज बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशील पारगांव येथे येत आहेत.आज शुक्रवारी दि.२५ ऑगस्ट रोजी डॉ. तुकाराम नेहरकर यांचे वडील कै. भानुदास नेहरकर (मुकादम) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्यानिमित्ताने त्यांचे आगमन आहे. सकाळी ११ ते १२ या वेळात त्यांचा वैचारिक संवाद होणार आहे. यावेळी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज त्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.ज्येष्ठ किर्तनकार ह. भ.प. आसाराम महाराज बडे यांचा सकाळी ९ ते ११या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहणार असल्याचे आदीनाथ नेहरकर आणि डॉ.तुकाराम नेहरकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या