Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथे माजी आ.भीमराव धोंडे आणि पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या हस्ते मंगळवारी बक्षीस वितरण..

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आष्टी येथील भगवान महाविद्यालयामध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व स्पर्धांचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना आष्टी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांचे उपस्थितीत आणि माजी आ.भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी दिली. सर्व स्पर्धांसाठी रोख स्वरूपातील बक्षीसांसोबतच स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा प्रकार आणि विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे- तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा- प्रथम- शुभम गाडे ३००१ रु.,द्वितीय- अक्षय जगताप २००१, तृतीय- सतीश चव्हाण १००१ रु, उत्तेजनार्थ- (प्रत्येकी ५००रु ),दादासाहेब भवर ,दिनेश पवार, संतोष कणसे,पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा- प्रथम- (विभागून) जलाद्दी सुवर्णा,कादियाम फाम तेजा,किरण जेट्टी आणि सुमय्या अत्तार, कोमल भोगाडे, राजनंदिनी लगड २१०१ रू,द्वितीय- आश्लेषा दहिफळे,अंकिता नाईक, समृद्धी वाघमारे, सुचिता शिंदे,गीता शेळके १५०१ रु,तृतीय- किरण साप्ते, अनुजा गाडे,वैष्णवी पतेत,अनुपमा मोहोळकर,पूजा नाकाडे, अदिषा पठाण १००१ रू, उत्तेजनार्थ- ओम बोडखे ५०१ रु,निबंध स्पर्धा- प्रथम- सानिका ढोरमारे ११५१ रू,द्वितीय- (विभागून) पूजा लाड, मोनाली मोहोळकर ७५१ रु, तृतीय- रूपाली कदम ५५१ रु,रांगोळी स्पर्धा- प्रथम -अमृता जोशी ११५१ रु,द्वितीय- श्रद्धा कवटारनवरे, ऋतुजा काकडे, पायल जगताप, श्रद्धा नवसुपे,पायल डाडर ७५१ रूतृतीय- आदित्य पोकळे, साक्षी धोंडे, वैष्णवी तावरे ५५१ रु,मैदानी स्पर्धा (४०० मीटर धावणे)-(मुली) प्रथम- रेणुका डोके १००१ रु,द्वितीय- सरला गर्जे ७०१ रु,तृतीय- पायल डाडर ५०१ रु, उत्तेजनार्थ- वृषाली धनवडे २०१ रु,(मुले) प्रथम- किशोर गर्जे १००१ रु,द्वितीय- माऊली फुंदे ७०१ रु, तृतीय- ज्ञानेश्वर गर्जे ५०१ रु,उत्तेजनार्थ -वैभव घुले २०१ रु यांचा समावेश आहे.या सर्व विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्राप्त करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या