आष्टी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून बीड
जिल्हा कार्याध्यक्ष आबासाहेब खिलारे आणि व माजी जिल्हा कार्याध्यक्ष बापु जगताप आणि आष्टी
तालुका माजी सचिव त्रिंबक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी तालुका ग्रामसेवक
संघटनेचे निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी नवनाथ लोंढे तर सचिवपदी गोवर्धन
सायंबर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.आष्टी तालुका ग्रामसेवक संघटनेची
नुकतीच बैठक संपन्न झाली.तालुकाध्यक्षपदी ग्रामसेवक नवनाथ लोंढे तर सचिवपदी
ग्रामसेवक गोवर्धन सायंबर यांची अविरोध निवड करण्यात आली असून सहसचिवपदी
बाळासाहेब पालवे,उपाध्यक्षपदी शिवाजी औंदकर,प्रसाद आरु, कवडे अनिता,
कार्याध्यक्षपदी भागवत अनारसे,कोषाध्यक्षपदी घोडके दत्तात्रय, सदस्यपदी मोरे शिवाजी,
,भवर रामेश्वर, शिंदे उद्धव,आदक निशा सल्लागारपदी जगताप बापू, मुळीक त्रिंबक,
तांदळे हरिभाऊ,खेडकर बाळासाहेब आदींची निवड करण्यात आली.
या बैठकीस बहुसंख्येने
तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या