
सध्या आरोग्य विभागात रिक्त जागांचे प्रमाण खुप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक
कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा तान
पडतो असे असतांनाही विजया जोशी नेहमीच कोणत्याही कामाचा तान न घेता आपले काम पुर्ण
करत रूग्ण सेवा केली.तणावमुक्त काम कसे करायचे याचे कौशल्य आम्ही जोशी मॅडम कडून
शिकलोत असे भावोध्दगार टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
नितीन मोरे यांनी काढले.टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका म्हणुन सेवेत
असलेल्या विजया जोशी या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत.त्यामुळे टाकळसिंग
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन डाॅ. नितीन मोरे बोलत होते.या कार्यक्रमाला
पञकार संतोष सानप, शरद रेडेकर, सचिन रानडे सह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित
होते.पुढे बोलतांना डाॅ.मोरे म्हणाले की,विजया जोशी या नेहमीच आपल्या कामाशी
इमानदार राहिल्या.प्रत्येक काम त्यांनी वेळेत पुर्ण करून नविन आरोग्य
कर्मचाऱ्यांसाठी अदर्श निर्माण केला.रूग्ण सेवेबरोबरच ऑफिसचे काम देखील त्या वेळेत
पुर्ण करत.आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध
कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त तान पडतो. अशा परिस्थितीत देखील जोशी मॅडम यांनी
कामाचा ताण न घेता रूग्ण सेवा केली. त्याबरोबर प्रत्येक काम वेळेत पुर्ण केले.
तणावमुक्त काम कसे कराचे याचे कौशल्य आम्ही जोशी मॅडम कडून शिकलो असल्याचे त्यांनी
सांगीतले. यावेळी आरोग्य कर्मचारी जयश्री जाधव, सुवर्णा गायकवाड, नागेश कारंडे,
दिगंबर भोंगाळे, गणपत सोनवणे, वर्षा धोंडे सह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या
कार्यक्रमाला वर्षा धोंडे, नागेश कारंडे, बाप्पा पारेकर, मोबीन खान, दिगंबर
भोंगाळे, गणपत सोनवणे, नवनाथ गर्जे, तुषार जानवळे, प्रतापसिंह डफळे, अक्षय वाघुले,
परमेश्वर धस सह जोशी कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या