Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनाथ गाडे यांना मातृशोक

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनाथ निवृत्ती गाडे (गुरुजी) यांच्या मातोश्री आणि अहमदनगर येथील इंपल्स हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ञ डॉ.संदीप गाडे आणि नेत्रतज्ञ डॉ.विजय गाडे यांच्या आजी श्रीमती सीताबाई निवृत्ती गाडे (वय ९४) यांचे बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि. बुधवारी दुपारी तीन वाजता साबलखेड येथील वैकुंठभूमी येथे झाला.सीताबाई गाडे या जुन्या पिढीतील होत्या.एकत्र कुटुंब पद्धतीचा गाडा सांभाळणाऱ्या आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा समाजाला सुसंस्कार देणाऱ्या एक आदर्शमाता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यापाठीमागे पाच मुले आणि तीन मुली,सुना,नातवंडे,परतोंडे असा मोठा परिवार आहे.त्यांनी अतिशय खडतर परिश्रमातून आपले कुटुंब उभा केलेले आहे.मुलांना शिक्षण दिले.आज जवळपास ५० सदस्यांचे कुटुंब एकत्रितपणे आहे.अंत्यविधीस माजी आ.भीमराव धोंडे,उद्धवबापु दरेकर, समाजसेवक विजय गोल्हार,परमेश्वरकाका शेळके,रमजान तांबोळी, प्रा.डॉ.बाळासाहेब धोंडे, राजेंद्र दहातोंडे,विक्रम पोकळे,भगवान एकशिंगे, भाऊसाहेब देसाई,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, डॉ.घुगे,ह.भ.प. संतोष महाराज मोरे, ह.भ.प.भगत महाराज, पत्रकार उत्तम बोडखे, सुरेश पवार, ज्योती देसाई,वैजनाथ रायते, भूकन ,बा.ल.पवार,सिद्धेश्वर शेंडगे, बाबासाहेब मुळीक,शिरीषभाऊ थोरवे, लटपटे,प्रा.भाऊसाहेब काळे,डॉ.संतोष जाधव,प्रा.अविनाश भवर,बोरसे मुकादम आदी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, धार्मिक,व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ----------------------------- सोबत फोटो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या