Ticker

6/recent/ticker-posts

ओ खाबो के दिन, ओ..किताबो के दिन, सवालों की राते, जवाबो के दिन..... हंबर्डे महाविद्यालयातील वर्गमित्रांच्या स्नेह मिलन महामेळाव्यात आठवणींचा बहर!..

उत्तम बोडखे,आष्टी. -------------- त्या काळातील आणि सध्याच्या वयोमानातील विविध बदलाला घेऊन एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या आठवणींचा झालेला बहर.. हंबर्डे महाविद्यालयाच्या सभागृहात स्नेह, कौतुक आणि सदगदीत भावनांनी वातावरण सुगंधी करून गेला... निमित्त होते तब्बल ४९ वर्षानंतर वर्गमित्रांच्या गेट-टुगेदर या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे! आष्टी शहरातील हंबर्डे महाविद्यालयातील ४९ वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन महामेळावा शनिवार दि.१९ आगस्ट रोजी संपन्न झाला. सन १९७२ ते २०२३ चे सर्व माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.स्नेह मिलन महामेळाव्यात अनेकांचे भाषणे झाली.४९ वर्षानंतर विद्यार्थी या महामेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.गुरु व विद्यार्थ्यांंना आपला सेवाकाळ आठवला. विद्यार्थ्यांना आपलं महाविद्यालयीन जीवनातील आठवणी आठवल्याने मन हेलावून गेले.विद्यार्थी आणि शिक्षक अनेक वर्षानंतर भेटण्याचा आनंद,शब्दांना वाट मोकळी करता आली.स्नेह मिलन महामेळावा ४९ वर्षांपानंतर योग आला.यापुढे दरवर्षी वर्षातून एकदा का होईना असा स्नेह मिलन मेळावा घेण्यात यावा अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली.यावेळी दोस्ताना चित्रपटातील ..... ओ खाबो के दिन, ओ..किताबो के दिन, सवालों की राते, जवाबो के दिन, कई साल हमने गुजारे यहा, यही साथ खेले, हुऐ हम जवा, था बचपन बडा आशिकाना हमारा. या गीतांची आठवण माजी विद्यार्थी या नात्याने करून गेले. आठवणीनी सर्व विद्यार्थी,मित्र, भारावुन गेले होते.आष्टी शहरातील हंबर्डे महाविद्यालयातील जवळपास एक हजारापेक्षा जास्त माजी विद्यार्थी या महामेळाव्याला उपस्थित होते.तब्बल ४९ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी प्रथमच एकत्र आले होते.४९ वर्षांपासूनच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन महामेळावा पार पडला.आपण दरवर्षी क्लासमेंटांचे गेट टुगेदर करुया असे अनेक जण यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जे आपल्या ग्रुपमध्ये होते.ज्यांचे निधन झाले आहे.या मित्र,मैत्रीणांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सर्व मित्र मंडळी (माजी विद्यार्थी) या स्नेह मिलन महामेळाव्याच्या निमित्ताने ४९ वर्षांनी एकत्र आले होते.आनंद, स्नेह,कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.४९ वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेह-यावर उत्सुकता,आनंद,मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने गुरु जणांचा सत्कार केला.माजी विद्यार्थींनी तत्कालीन गमतीजमती,सुख, दुःख,झालेल्या चुका,मिळालेले यश,मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली. ४९ वर्षांनी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक,मोबाईल व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला.गरजेनुसार महविद्यालयास आवश्यक ती मदत करण्याचे विद्यार्थ्यांंनी मत व्यक्त केले.यावेळी माजी विद्यार्थी दीपक शामगीरे यांनी महाविद्यालयास ५००० रु देणगी दिली.गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हजाराहून अधिक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी एकत्र आले होते.तब्बल ४९ वर्षाने या सर्व विद्यार्थी मित्रांची पुनर्भेट झाली.यापैकी काहीजण नियमित भेटणारे होते तर अनेकांची कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच भेट होत होती. एकमेकांना भेटून ओळख दाखवून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात सर्व मित्र हरखुन गेले होते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या या आनंदात त्यांचे तत्कालीन शिक्षक असणारे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे,अतुल मेहेर, सुभान पठाण,बाळासाहेब वर्धमान,शामभैय्या धस,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,अविशांत कुमकर, सायली हंबर्डे, व्ही.एल.शिंदे, वसंतराव देशमुख,राम हंबर्डे,दिलीप घायाळ, शिवाजी झाडे,कृष्णा सोनवणे, प्रा.शंकरराव लगड, सौ.सरस्वती माने - जाधव प्राध्यापक ,सर्व संचालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वाल्मिकतात्या निकाळजे, समाजसेवक विजय गोल्हार, काकासाहेब शिंदे,डॉ. नदीम शेख,हुसेन करदुस,सुनिल निकाळजे,सुनिता चौधरी,राम बोडखे,वर्षा बडे,प्रोफेसर डॉ.संभाजी वाघुले, सुभाष महाडीक,हरिभाऊ दाहातोंडे,डीवायसपी मंदा घोगरे, प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,उत्तम बोडखे,गौतम निकाळजे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,कल्याण पोकळे,सुनिल उमाप,प्रदीप चव्हाण,प्रशांत सहस्रबुद्धे,प्रा.महेश चवरे , वाल्मिकतात्या निकाळजे, डीवायएसपी मंदा घोगरे ,सौ.निशा उर्फ सविता बाळासाहेब आजबे, सौ.सुलभा किशोर हंबर्डे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,अण्णासाहेब चौधरी, प्राचार्य हरिदास विधाते, युनुसशेठ शेख,काकासाहेब शिंदे,उत्तम बोडखे ,दत्ता काकडे, प्रा.शिवाजी झाडे,प्रा.नामदेव पालवे,प्रा.राम हंबर्डे,किशोर झरेकर,अशोक गवारे, रत्नदीप निकाळजे, संजय डोके,आदिनाथ पोकळे, महेश सावंत,वकील संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे,विठ्ठल आजबे,गौतम निकाळजे,प्रा.भाऊसाहेब काळे, प्रा.बाळासाहेब धोंडे,प्रा.बापू धोंडे,भाऊसाहेब भवर,प्रा. शंकरराव काकडे,कल्याण पोकळे,सुखदेव पोकळे,श्रीमती शुभदा पोकळे (ACP मुंबई), मच्छिंद्र पवार, काकडे (पुंडी) आदि मान्यवर उपस्थित होते.यातील अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत जुन्या आठवणी जाग्या केल्या. चौकट -------- दरम्यान झालेल्या या संवाद चर्चेत सर्व माजी विद्यार्थ्यांनी संपर्कात राहून महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने सहभाग नोंदवून महाविद्यालयास आर्थिक आणि तर मदत करून सहकार्य करण्याची भावना यावेळी निश्चित करण्यात आली.यावेळी एक हजाराहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या