Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी घाटा येथे ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहास प्रारंभ --- विदर्भ रत्न ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांची रामकथा.

आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, रामकथा आणि अखंड हरिनाम सप्ताह दि.१७ ते २४ आगस्ट या कालावधीत होत आहे. या हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीच्यावतीने करण्यात येत आहे.ह.भ.प.संत मदन महाराज यांनी प्रारंभीत केलेला आणि ह.भ.प.वै.संत वामनभाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा या भूमीत १७ ते २४ ऑगस्ट या कालावधीत हरिनाम सप्ताह सुरू झालआहे.या सप्ताहात काकडा,विष्णु सहस्त्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,रामायण कथा,हरिपाठ,हरिजागर होत आहे.ह.भ.प.सानिक्षा महाराज आमटे,ह.भ.प.रामकृष्ण महाराज,ह.भ.प.अक्षय महाराज उगले, ह.भ.प.उमेश महाराज दशरथे,ह.भ.प. संजय महाराज पाचपोर,ह.भ.प.आसाराम महाराज बडे,ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज याचे किर्तन होणार आहे. रामायणाचार्य विदर्भ रत्न ह.भ.प.संजय महाराज पाचपोर हे आपल्या मधुर वाणीतून रामायण कथा सांगणार आहेत.दि‌.२४ आगस्ट रोजी काल्याचे किर्तन मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे होणार आहे.कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.या नाम सप्ताहास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या