जिजाई मसाले दुबई,जर्मनीनंतर जगभरात प्रसिद्धी होणार युवा उद्योजक बाबू गर्जेंना व्यापक प्रसिद्धी मिळावी



उत्तम बोडखे,आष्टी.
------------
नवयुवकांनी नोकरीच्या मागे न लागता नवनवीन उद्योजकतेच्या कल्पना प्रत्यक्षात राबवाव्यात आणि उद्योजक तिकडे वळावे अल्पावधीत आष्टीचा जिजाऊ मसाले,जर्मनीत आणि दुबईत प्रसिद्ध झाले म्हणजे ते आता जगभर प्रसिद्ध होणार आहेत ग्रामीण भागातील बाबुभैया गर्जे यांची यशस्विता आणि त्यांची यशोगाथा याबद्दल पत्रकारांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आष्टी येथील पत्रकार भवनामध्ये पूर्वाश्रमीचे संपादक असलेले बाबूभैया गर्जे यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,श्री बाबूभैया गर्जे यांनी पत्रकारिता सोडून उद्योजकतेकडे लक्ष दिले.त्यांनी आपल्या बावी या छोट्याशा खेड्यामध्ये उद्योग उभारणी करून केवळ दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला जिजाई मसाले हा उद्योग अत्यंत यशस्वी झाला आहे.आष्टीच्या बाजारपेठेतील जिजाई मसाले दुबई आणि जर्मनीच्या मार्केटमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे आता लवकरच संपूर्ण जगभरामध्ये जिजाई मसाल्यांना बाजारपेठ निर्माण होणार आहे. पत्रकारांनी अशा प्रकारच्या उद्योजकतेबद्दल व्यापक प्रसिद्धी देण्याची आवश्यकता आहे.राजकीय लोकांना प्रसिद्धी मिळत असते ती त्यांना आवडतही असते.परंतु पत्रकारांनी अशा प्रकारे एका ग्रामीण भागातील उद्योजकाच्या यशस्वीतेची गाथा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून नव तरुणाईला प्रोत्साहित होईल अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित कराव्यात असे आवाहन केले.बाबूभैया गर्जे यांनी नवीन युवकांसमोर फार मोठा आदर्श निर्माण केला आहे असे सांगत युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे त्यांचे कार्य असल्या चे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार केला यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती बाबूभैया गर्जे म्हणाले की,सुरुवातीला मला पत्रकारितेची आवड असल्यामुळे मी थेट दैनिक सुरू केले परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे अचानक निधन झाल्यामुळे त्यानंतर मला फारसा आधार न मिळाल्यामुळे मी नाईलाजाने पत्रकारितेतून माघार घेतली.मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला रोजी रोटी साठी काहीतरी हालचाल करणे आवश्यकच होते त्यातून नोकरीच्या निमित्ताने माझी एका चांगल्या व्यापारी व्यक्तिशी ओळख झाली त्यांनी मला महाराष्ट्रभर फिरण्याची संधी दिली त्यातून मला जाणीव झाली की,एवढे कष्ट जर आपण केले तर आपल्या व्यवसायातून आपण काहीतरी करून दाखवू असा आत्मविश्वास आल्यामुळे ..
मी केवळ १५ लाख रु. कर्ज घेऊन माझा व्यवसाय सुरू केला कोविड काळातदेखील माझा व्यवसाय चालू होता पहिल्याच वर्षी १.५० कोटी रु.व्यवसाय झाला आणि आज २वर्षात ४ कोटी रु.उलाढाल झाली असून आमच्या जिजाई मसाले दुबईत आणि जर्मनीमध्ये निर्यात केले जात असून सध्या माझ्याकडे ६५ कर्मचारी असून विशेष म्हणजे त्यातील बहुतांश हे ऊस तोडणी मजुरांची उच्चशिक्षित मुले आहेत त्यांना रोजगार देता आल्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे असे सांगून जिजाई मसाले या उद्योगाचे मुंबई पुणे अहमदनगर नाशिक या ठिकाणी विक्री केंद्र सुरू केले असून आष्टीच्या २०० किलोमीटर परिसरातील प्रत्येक मोठ्या हॉटेल व्यवसायामध्ये जिजाई मसाले वापरले जात आहेत असे सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद ढोबळे यांनी बाबू भैया गर्जे यांच्या सत्कार सोहळ्याचा उद्देश सांगून या विषयीची माहिती दिली.यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचे समयोचित भाषण झाले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद रेडेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,आष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, मेहेर ज्वेलर्सचे संतोष मेहेर,माजी जिल्हा परिषद सदस्य खंडूदादा जाधव, संजयदादा आजबे, यशवंत खंडागळे, मुर्शिदपूर कासारीचे ग्रामपंचायतचे सरपंच अशोक मुळे, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, माजी गटविकास अधिकारी बबन खंडागळे, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन, नगरसेवक सुरेश वारंगुळे,शेख शरीफ,सत्कारमूर्ती बाबूभैय्या गर्जे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती कविता गर्जे,पत्रकार रघुनाथ कर्डिले,गणेश दळवी,प्रवीण पोकळे संतोष सानप,मनोज पोकळे,अविशांत कुमकर,बापू गुरव,सचिन रानडे,
गोरख सोनवणे, सुरज शुक्ला आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या