Ticker

6/recent/ticker-posts

१२ ऑगस्ट रोजीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीस उपस्थित रहावे ------- युवा नेते ऋषिकेश राजेंद्र दरेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांची बीड येथील जाहीर सभा यशस्वी होण्यासाठी आष्टी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कामधेनु मंगल कार्यालय हिवरा या ठिकाणी आयोजित केली आहे अशी माहिती युवा नेते ऋषिकेश राजेंद्र दरेकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना दरेकर पुढे म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा बीड येथे दि.१७ आगस्ट रोजी होणार आहे.बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांची सभा यशस्वी होणेसाठी आष्टी तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे याचे नियोजन करण्यासाठी शनिवार दि.१२ ऑगस्ट रोजी कामधेनु मंगल कार्यालय हिवरा येथे बैठकीचे आयोजन केले आहे.या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख आणि बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.संदीपभैय्या क्षीरसागर हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आष्टी तालुक्यातील शरदचंद्र पवार यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते ऋषिकेश राजेंद्र दरेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या