

आष्टी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ लोंढे यांची तर ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी आबासाहेब खिलारे आणि ग्रामसेवक संघटनेच्या आष्टी तालुका सचिवपदी गोवर्धन सायंबर यांची अविरोध निवड करण्यात आली.आष्टी पंचायत समिति सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत या निवडी झाल्या.नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा सभापती बद्रीनाथ जगताप,
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे....
आबासाहेब खिलारे (जिल्हा कार्याध्यक्ष),नवनाथ लोंढे (आष्टी तालुकाध्यक्ष), गोवर्धन सायंबर (तालुका सचिव),बाळासाहेब पालवे (सहसचिव),
शिवाजी ओंदकर, प्रसाद आरु आणि अनिता कवडे (हे तीन तालुका उपाध्यक्ष),भागवत अनारसे,दत्तात्रय घोडके (हे दोन कार्याध्यक्ष) तर शिवाजी मोरे, रामेश्वर भवर,उध्दव शिंदे हे सदस्य तर निशा आदक (महिला सदस्या), बापू जगताप, त्रिंबक मुळीक, हरिभाऊ तांदळे, बाळासाहेब खेडकर हे ज्येष्ठ सल्लागार आहेत.नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ लोंढे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,कर्मचारी,सामाजिक,राजकीय आदि क्षेत्रातील आणि सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या