
वाचाळवीर मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे यांच्यावर कठोर कारवाई करत अटकेची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांच्यासह बहुजन समाजाने केली असून यासंदर्भात आष्टी पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. मनोहर भिडे याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर राज्यभर समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी दत्ता बोडखे यांनी दिला आहे.मनोहर भिडे याने मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवामानकारक वक्तव्य केले होते. मनोहर भिडे याच्याकडून नेहमीच महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करण्यात येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.मनोहर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांना येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात डांबून टाकावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांच्या सह विविध बहुजन समाज संघटनांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष राऊत, बांधकाम विभागाचे इंजि. रोहित सायकड,राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते अशोक पोकळे, ग्रामपंचायत सदस्य आदेश निमोनकर,ॲड.प्रबोधन निकाळजे,ॲड.राजदीप निकाळजे, सुरज शिंदे, कृष्णा धोंडे, सौरभ धोंडे, शंकर धोंडे, डॉ.सुनील गदादे यांच्यासह यांच्या सह विविध बहुजन समाज संघटना व समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, फुले प्रेमी नागरिक आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या