Ticker

6/recent/ticker-posts

* -------- स्व.बबनराव शिंदे आण्णा यांच्या वैयक्तीक आणि सामाजिक जीवनात खूप अडचणी आल्या होत्या परंतु या संकटाला न घाबरता न डगमगता ते त्याला सामोरे गेले. समस्येचा अभ्यास करत असत.त्याचे मूळ कारण शोधून काढत असत त्याच्या होणाऱ्या साधक बाधक परिणामांचा विचार करून त्यावर मार्ग काढत असत.प्रत्येक प्रतिकूल प्रसंगात खंबीरपणे उभे राहून आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर त्याचा कसलाही परिणाम बबनआण्णा होऊ देत नव्हते.अंत्यत चौकसबुध्दी,कष्टाळु, सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि काटकसरीपणा अशी त्यांची ख्याती होती. स्वामीनिष्ठ होते.स्व. बबनराव शिंदे हे अत्यंत प्रमाणिकपणे जीवन जगले असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांनी केले.स्व. बबनराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिलीपराव काळे, नामदेव राऊत,बन्शीभाऊ पोकळे,विक्रम पोकळे, अशोक गर्जे,डॉ. विलासराव सोनवणे, सुखलाल मुथा,संजयशेठ मेहेर,उत्तम बोडखे, समाजसेवक विजय गोल्हार,साहेबराव म्हस्के,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,वाल्मीकराव निकाळजे,माजी आ. साहेबराव दरेकर,माजी आ.भीमराव धोंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. स्व.बबनराव शिंदे हे कष्टाळु,प्रमाणिक, निष्ठावान आणि व्यासंगी व्यक्तिमत्व होते.निष्ठा आणि विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे बबनराव शिंदे होते.आष्टी शहरातील शिंदे परिवाराचे प्रेरणास्थान स्व.बबनराव शिंदे होते.बबनराव शिंदे व्यक्ती म्हणून तर सर्वगुणसंपन्न होते.त्यांची स्वतःची एक विचारधारा होती.त्या विचारधाराशी ती कुठल्याही परिस्थितीत तडजोड करीत नव्हते.ते ज्या कोणत्या क्षेत्रात काम करीत होते त्यासाठी ते निष्ठेने व अतिशय प्रमाणिकपणे काम करत होते म्हणूनच ते जीवनात यशस्वी झाले होते. सौ.मंगल विधाते ही मुलगी तर शरद शिंदे , बाळासाहेब शिंदे,रमेश शिंदे आणि उमेश शिंदे हे पाच मुले आहेत. आण्णांच्या कुंटुंबात १९ सदस्य आहेत.थोरला मुलगा शरद शिंदे मंडळ अधिकारी,सौ.उज्ज्वला शिंदे (शिक्षिका),रमेश शिंदे (शिक्षक),सौ.शारदा शिंदे(शिक्षिका),सौ. अर्चना शिंदे (शिक्षिका), बाळासाहेब शिंदे हा दुध संस्थेचे चेअरमन आहे तर सर्वात धाकटा मुलगा उमेश शिंदे हा प्रसिध्द व्यवसाईक आहे.१९ पैकी ५ सदस्य नौकरीत आहेत.दोन नाती एम.डी.डाॕक्टर आहेत. जावाई बँकेतुन सेवानिवृत झाले आहेत. नातु नौकरीस आहेत असे अनेकांनी सांगितले. यावेळी माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर, वाल्मीक निकाळजे, ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,सुखलाल मुथ्था, समाजसेवक विजय गोल्हार,नगराध्यक्ष जिया बेग,डॉ.विलासराव सोनवणे,साहेबराव मस्के, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,समीर शेख,अस्लम बेग,रमेश मुळे,चेअरमन शांतीलाल भोसले,व्हाईस चेअरमन अशोक गर्जे,संजयसेठ मेहेर,दिलीपराव काळे, सुभाष रासकर,गो.बा. सायकड,नामदेव राऊत,पत्रकार उत्तम बोडखे, पत्रकार सीताराम पोकळे,रमेश मुळे, प्राचार्य सुरेश बोडखे, चेअरमन बन्शीभाऊ पोकळे, अहेमद पठाण,संतोषशेठ मेहेर,संपतराव धोंडे, विक्रम पोकळे,पी.वाय. काळे,पोपटराव घुले, रघुनाथ शेळके,सौ. सविताताई गोल्हार, प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजप्रबोधनकार हे.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु यांचे प्रवचन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या