Ticker

6/recent/ticker-posts

कष्टाळु,प्रमाणिक, निष्ठावान,व्यासंगी व्यक्तिमत्व बबनराव शिंदे

प्रत्येक स्वतंत्र असलेल्या व्यक्तिमत्वाचा सभोलताच्या वातावरणावर,समाजावर,कुटुंबावर,मित्रांवर किंवा त्याच्या एकूणच कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्वच घटकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो. आपल्या असामान्य व्यक्तीमत्वाने समाजात स्वतःचे एक आगळे वेगळे स्थान निर्माण करणारे खूप कमी लोक पहायला मिळतात असेच आष्टी शहरातील एक कष्टाळु,प्रमाणिक,निष्ठावान व व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार ॲड.निवृत्तीराव उगले यांचे २२ वर्षे स्वीय सहाय्यक म्हणुन राहिलेले बबनराव शिंदे (आण्णा) यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे.आष्टी शहरातील शिंदे परिवाराचे प्रेरणास्थान बबनराव शिंदे (आण्णा) होते.एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण हेरून ते आत्मसात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीच्या एकूणच व्यक्तीमत्वांपासून प्रेरणा घेणे,बबनराव शिंदे (आण्णा) व्यक्ती म्हणून तर सर्वगुणसंपन्न होते.त्यांची स्वतःची एक विचारधारा होती.त्या विचारधाराशी ती कुठल्याही परिस्थितीत तडजोड करीत नव्हते. ते ज्या कोणत्या क्षेत्रात काम करीत होते त्यासाठी ते निष्ठेने व अतिशय प्रमाणिकपणे काम करत होते म्हणूनच ते जीवनात यशस्वी झाले होते.जगाच्या प्रवाहाबरोबर वाहत राहून कायम स्वकर्तुत्वाला गती देण्याचे काम आण्णांनी केले.अखंड क्रियाशील राहून कामात स्वतःला वाहून घेणे त्यांना आवडत असे,थांबणे हे त्यांच्या मूळ स्वभावातच नव्हते त्याचे कारण आपली नैसर्गिक रचना ही आपल्याला कायम गतिमान राहण्याचेच शिकवते.समाजात असा एकही मनुष्य नाही की, ज्याला काहीच समस्या नाहीत.मनुष्य पद, सत्ता,संपत्तीने कितीही मोठा असला तरी तो सर्व समस्यामुक्त असेलच असे कधी होत नाही.माणुस सर्व गुणसंपन्न असला तरी त्याच्या जीवनात दुःख,अडचणी येणार नाहीत असे कधी होत नाही.प्रत्येकाला या जीवन प्रवासात संकटांचा सामना करून पुढे जावेच लागते फक्त त्यातील काही जण संकटावर यशस्वी मात करतात तर काही कोलमडून पडतात.बबनराव शिंदे आण्णा यांच्या वैयक्तीक व सामाजिक जीवनात खूप अडचणी आल्या होत्या परंतु या संकटाला न घाबरता न डगमगता ते त्याला सामोरे गेले.समस्येचा अभ्यास करत असत.त्याचे मूळ कारण शोधून काढत असत त्याच्या होणाऱ्या साधक बाधक परिणामांचा विचार करून त्यावर मार्ग काढत असत.प्रत्येक प्रतिकूल प्रसंगात खंबीरपणे उभे राहून आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर त्याचा कसलाही परिणाम आण्णा होऊ देत नव्हते.अंत्यत चौकसबुध्दी,कष्टाळु ,सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि काटकसरीपणा अशी ज्यांची ख्याती होती आणि स्वामीनिष्ठ आणि आण्णांचे कुंटुंब माजी आ.ॲड.निवृत्तीराव उगलेसाहेब आणि माजी आ.भीमराव धोंडेसाहेब यांच्या आशीर्वादाने सक्षम आणि सबल झाले आहे हे गुण अंगी असणारे बबनराव शिंदे आण्णा होते.हे सर्व गुण त्यांच्यात उपजतच आलेले होते.बबनराव शिंदे आण्णा यांना ८५ वर्षाचे आयुष्य लाभले. बबनराव शिंदे यांचा जन्म दि.३ जानेवारी १९४० चा.अंत्यत गरीब कुंटुंबात जन्मलेले आण्णा प्रतिकुल परीस्थीतीवर मात करीत जगले. दहावीपर्यत शिक्षण घेतले.१९५५ मध्ये १० वी. पास झाले. त्यांनी खांद्यावर पिण्याच्या पाण्याची कावड घेऊन घराघरात पाणी वाहिले.दररोज ७० ते ८० कावडी घरात टाकत असे,तीन ते पाच पैशाला एक कावड होती.पत्नी सौ.रुक्मिणीबाई शिंदे या ही संसाराचा गाडा पुढे जावा म्हणुन लोकांच्या घरी धुणी भांडी करीत असत.कष्टाची या पती - पत्नीला लाज वाटली नाही.श्रमाला प्रतिष्ठा असते अशा विचाराचे ते होते.काही दिवसानंतर आष्टी शहरातील तत्कालीन प्रसिध्द वकील ॲड.रामराव देशपांडे यांच्याकडे १० रु महिन्याने वाचनालयात आणि वर्तमानपत्र वाटपचे काम केले. संसाराच्या वेलीवर मंगल,शरद ,बाळासाहेब, रमेश आणि उमेश हे पाच फुले उमलली. बबनराव शिंदे आण्णा यांनी आष्टी शहरात अहमदनगर जिल्हातील घोगरगावावरुन वकीलीसाठी आलेले ॲड.निवृत्तीराव उगले यांच्याकडे कारकुनचे काम सुरु केले.तब्बल २२ वर्षे उगले साहेबांकडे कारकून आणि त्यानंतर पी.ए.चे (स्वीय सहाय्यक) प्रमाणिकपणे काम केले.१९६७ साली कम्युनिस्ट पक्षातुन ॲड.उगलेसाहेब आमदार झाले.तत्कालीन आ.भाऊसाहेब आजबे यांचा पराभव विश्वनाथभाऊ आजबे यांच्या मदतीने पराभव केला.त्यावेळी आसराजी जाधव,गुलाबराव पोकळे, बलभीमराव भोसले,काॕ.नानासाहेब पोकळे (आबा), भवरवाडीचे नानासाहेब मोरे यांना सोबत घेऊन ॲड.उगले निवडणुक जिंकले.पाच वर्षे आमदार,सहा वर्षे विधान परिषदेचे आमदार राहीले. या सर्व ११ वर्षाच्या काळात आण्णा पी.ए. राहिले.१९७२ साली ॲड. उगले साहेब यांचा भाऊसाहेब आजबे यांनीच ९ हजार मतांनी पराभव केला.उगले साहेब आमदार असताना त्यांनी एकदाच १९६७ साली पत्नीसह सर्व कुंटुंब मुंबईला नेले होते.शिंदेआण्णाही बरोबर होते. श१९७८ साली उगलेसाहेब विधान परिषदेचे आमदार आसताना कडा सह.साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले होते.आण्णा यांना त्यांनी शेती विभागात नौकरीस घेतले.आण्णा यांनी शेती ,आकाऊंट आणि शेअर्स विभागात काम केले.बारा (१२) वर्षे कारखान्याता ते राहिले. आ.सुरेश धस यांच्या ताब्यात हा कारखाना आला तेव्हा आण्णा सेवानिवृत झाले.ॲड. उगलेसाहेब आणि तत्कालीन आ.भीमराव धोंडे यांच्या कारकीर्दीत चांगले काम केले या दोन्ही नेत्यांचे विश्वासु म्हणुन राहिले.धोंडेसाहेब व उगलेसाहेब यांच्या कृपेने आण्णांचे कुंटुंब चांगले घडले.तत्कालीन आ.आजबे यांचे कट्टर समर्थक असलेले गोवींद शेंडगे यांचा दिगांबर तुळशीराम डोमकावळे यांना आष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आण्णांनी ११ मतांनी निवडुन आणले होते.हे प्रकरण शहरभर गाजले होते. मोठ्या माणसाचा पराभव केल्याने आण्णांचे चांगलेच कौतुक झाले होते.ॲड. उगले साहेब भुविकास बँकेचे संचालक असल्यामुळे बबनराव आण्णा त्यांच्याकडे पी.ए. असताना सर्जेराव बोडखे आणि आण्णाचे जावाई ज्ञानदेव विधाते यांना भुविकास बँकेत नौकरीला लावले.१९८२ साली ॲड.हरिचंद्र म्हसुजी शेकडे ,ॲड. उगलेसाहेब ,डाॕ.आर.डी.शिंदे या मित्रांना पंचायत समितीसमोर जागा घेतली .त्या जागेचा आण्णांनीच अकृषी क्षेत्र ( एन.ए.) केला होता.सर्व प्रक्रिया पुर्ण केल्याबद्दल आण्णांना बक्षीस म्हणुन एक गुंठा जागा देत होते. स्टॕम्प,खरेदी करण्यासही पैसे नाहीत असे सांगुन आण्णांनी ती जागा घेतली नाही असे प्रमाणिक व चांगली माणसे त्यांच्या काळात होती. हा ४० वर्षापुर्वीचा काळ आहे. प्रमाणिकपणाबद्दल आण्णाला १० वर्षे आष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे आविरोध संचालकपद नेत्यांनी दिले होते. आण्णांच्या कुंटुंबात १९ सदस्य आहेत.थोरला मुलगा शरद शिंदे मंडळ अधिकारी,सौ.उज्ज्वला शिंदे (शिक्षिका),रमेश शिंदे (शिक्षक),सौ.शारदा शिंदे (शिक्षिका),सौ. अर्चना शिंदे (शिक्षिका), बाळासाहेब शिंदे हा दुध संस्थेचे चेअरमन आहे तर सर्वात धाकटा मुलगा उमेश शिंदे हा प्रसिध्द व्यवसाईक आहे.१९ पैकी पाच सदस्य नौकरीत आहेत.दोन नाती एम.डी.डाॕक्टर आहेत. जावाई बँकेतुन सेवानिवृत झाले आहेत. नातु नौकरीस आहेत. बबनराव शिंदे आण्णाचे विविध गुणसंपन्न असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व होते.शिंदे कुटुंबासाठी आधारवड असणाऱ्या बबनराव शिंदे यांचे आज पुण्यतिथी आहे.यानिमित्त आज समाजप्रबोधनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु यांचे हरिकीर्तन होणारी आहे. बबनराव शिंदे आण्णांना भावपुर्ण श्रध्दांजली --उत्तम बोडखे, (उपसंपादक) ********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या