Ticker

6/recent/ticker-posts

गोवंश हत्या प्रकरणी कठोर कारवाई करणार ------ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस

पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी व्यक्त केला आहे.गोवंश हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देत त्यांनी आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकत आणि आष्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या करण्यात येत असत त्यासाठी पोलीस स्टेशन द्वारे खास पथक तयार करण्यात आले आहे. गोवंशाची वाहतूक करताना सुद्धा ही वाहतूक हत्या करण्यासाठी आहे ? की बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत आहेत ? याची अत्यंत कसशीने तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.यापूर्वी आष्टी पोलीस स्टेशन येथे अशा प्रकारचे गोवंश हत्येचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु त्यामध्ये मुख्य आरोपी सोडून मजूर वर्गाला आरोपी करण्यात आलेले दिसून येत आहे आपण स्वतः या खडकत येथील पाच-सहा ठिकाणी आणि आष्टी येथील तीन ठिकाणी सर्व ठिकाणांची पाहणी केली असून काही ठिकाणी अजूनही हत्या करण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे नागरिकांनी याबाबत अशा संशयास्पद गोवंशाची वाहतूक किंवा हत्या संबंधी माहिती प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या मोबाईल नंबरवर याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे गो हत्या बंदी कायदा प्रभावीपणे राबवणारे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या