महामानव, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या " वकिलीचे शताब्दी वर्ष " या निमित्ताने ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेट्स
अँड असोसिएशन न्यू दिल्ली या संस्थेकडून आष्टी येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि
डॉ. आंबेडकर विचार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असलेले प्रथितयश वकील ॲड. रत्नदीप
भीमराव निकाळजे यांना " सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन " हा पुरस्कार देऊन सन्मानित
करण्यात येणार आहे. हा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दि.२८ जुलै रोजी सकाळी १० ते
सायं.७ या कालावधीमध्ये आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण जि.ठाणे येथे आयोजित करण्यात
आला आहे. या पुरस्कार सोहळ्या मध्ये पुरस्कार स्वीकारावे असे निमंत्रण ऑल इंडिया
फेडरेशन ऑफ ॲडवोकेट्स ॲण्ड असोसिएशन न्यू दिल्ली या संस्थेचे अध्यक्ष श्री.रवी जाधव
आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रकाश जगताप यांनी ॲड.रत्नदीप निकाळजे यांना दिले आहे.
0 टिप्पण्या