आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांना प्रत्येकी तीन हजार रुपये महिना
देण्याचा न्याय निर्णय उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिला आहे याविषयीची
अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील रहिवासी असलेल्या श्रीमती
सुभद्रा महादेव गर्जे आणि श्री महादेव गर्जे यांना मोठा मुलगा बापूराव महादेव गर्जे
आणि धाकटा मुलगा संदीप महादेव गर्जे हे दोन मुले असून नोकरी लागल्यापासून आजपर्यंत
आई-वडिलांचा सांभाळ करीत नसून आई- वडिलांची परिस्थिती आजारामुळे अत्यंत नाजूक
झालेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची याचना करून उपविभागीय अधिकारी पाटोदा
यांचे समोर अर्ज दिला होता.गर्जे दाम्पत्याचा एक मुलगा बाबुराव महादेव गर्जे हे
शिक्षक असून इतर सर्व बाबींचा विचार करता आई वडील यांच्या वयाचा विचार करता दोन्ही
मुलांनी आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ मधील
तरतुदीनुसार निर्वाहासाठी आणि औषधोपचारासाठी एकूण रक्कम रुपये ६००० त्यापैकी
बापूराव महादेव गर्जे यांच्याकडून ३००० आणि संदीप महादेव गर्जे रा.सेलू जि.वर्धा
यांचे कडून देण्यात यावी असा निर्णय पाटोदा उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद कुदळे
यांनी दि.२२ जून रोजी दिला आहे .तसेच अर्जदार आई-वडील यांच्याकडून कोणतीही तक्रार
निर्माण होणार नाही याची दोन्ही मुलांनी दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे अशा
प्रकारचा हा निर्णय झाल्याने आष्टी तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
0 टिप्पण्या