चौकट
मीच विकास करतोय, माझ्यामुळेच योजना होत आहे असा कुणी गैरसमज करुन घेऊ नये. खुंटेफळ उपसा योजना ही भीमराव धोंडे,सुरेश धस ,साहेबराव दरेकर यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे असे मानणा-यापैकी मी आहे.आ.धस व माझी गेल्या आठवड्यात वर्तमानपत्रातुन स्टेटमेंटची जुगलबंदी रंगली होती.अगोदर त्यांनीच सुरु केले होतं त्यांनीच ती जुगलबंदी थांबवली.आपण आता तिघेही सत्तेत सहभागी आहोत.आपल्या राजकीय वजनाचा उपयोग आपण मतदार संघातील विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यासाठी करुया असे सांगत मतदार संघातील विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी तसेच खुंटेफळ प्रकल्पाबाबतही आपण उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्याशी बोललो आहोत.इतर कुठलीही अट समोर न ठेवता फक्त मतदार संघातील विकास कामे व्हावीत कोणतीही अडवणूक होऊ नये. यासाठीच आपण अजितदादाबरोबर सरकारमध्ये सामील झालो आहोत. यापुढे विकास कामासाठी भरपूर निधी मिळणार आहे. गावातील लोकांनीही विकास कामे सुरू असताना त्याकडे लक्ष देऊन ते दर्जेदार कसे होतील याकडे लक्ष द्यावे अधिकारी आणि गुत्तेदार यांनी या दोन्ही रस्त्याची कामे दर्जेदार करावीत रस्त्याच्या कामाबरोबर इतर कामांनाही निधी कमी पडू दिला जाणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर विकासासाठीच सत्तेच्या प्रवाहामध्ये सामील झालो आहे असल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. आष्टी तालुक्यातील देवळाली- कडा -टाकळी- रुईनालकोल आणि लोणी- पिंपळा- खुंटेफळ- धानोरा या ९ कोटी ५० लक्ष रुपये किमतीच्या या दोन रस्ता कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते शनिवारी टाकळी आणि पिंपळा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांद्वारे करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते परमेश्वर काका शेळके, युवा नेते सागर दरेकर, धैर्यशील थोरवे, जगन्नाथ ढोबळे, पंढरीनाथ पारखे, काकासाहेब शिंदे, संदीप सुंबरे,महेश आजबे, उपअभियंता शिवाजी सानप, अभियंता प्रदीप बादाडे , सरपंच सावता ससाणे,हरिभाऊ दहातोंडे, इंजि. बाळासाहेब भुकन, मोहनतात्या वाळके, बाबासाहेब शेंडगे, बबनराव पडोळे,नवनाथ तांदळे ,सभापती पप्पू गुंड,भाऊसाहेब घुले, अशोक पोकळे, नगरसेवक नाजिम शेख, सुभाष वाळके, बाबासाहेब भीटे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. आजबे म्हणाले की , पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील विविध रस्ते कामांसाठी २५ कोटी रु.मंजूर झाले असून यातून होणारे रस्ते दर्जेदार करण्यात येतील,कडा या गावाकडून टाकळीकडे येणाऱ्या रस्त्याचे काम अगोदर सुरू करण्यात येणार आहे कारण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे हा रस्ता पूर्वी ३.७० मीटर एवढा होता आता त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून आता हा रस्ता ५.५० मीटर एवढा रुंद होणार असल्याने या परिसरातील गावातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत .हा रस्ता ठेकेदाराने दर्जेदार करावा,विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधींची स्पर्धा असली पाहिजे कोणताही एका लोकप्रतिनिधीने विकास कामाचे श्रेय घेऊ नये.मी देखील खुंटेफळ साठवण तलावाचे श्रेय एकटा घेणार नाही..या महत्त्वाकांशी प्रकल्पासाठी आ.सुरेश धस माजी आ.भीमराव धोंडे माजी आ.साहेबराव दरेकर यांना देखील या कामाचे श्रेय जाते. त्यामुळे होणारे आरोप आणि प्रत्यारोप थांबवले आहेत मी पूर्वीच्या पाटाने वाहत्या पाण्याऐवजी शिम्पोरा येथून थेट पाईप लाईन द्वारे खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी जावे यासाठी प्रयत्न केले.. कारण थेट पाईपलाईन द्वारे १०० टक्के पाणी पोहोचणार असल्याने या योजनेसाठी प्रयत्न केले ..त्यावेळेस निघालेले शिंम्पोरा ते खुंटेफळ पाउपलाईनची काम स्थगीती नसती तर आत्ता पर्यंत ब-या पैकी काम मार्गी लागले असते.पण आता पुन्हा त्यामध्ये बी १ टेंडर निघून लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी आम्ही दोघे मिळवून प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतले.सध्या या तलावामध्ये १.६८ टी.एम.सी.पाणी येणार आहे. मात्र, आपण सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून आपल्या वाट्याचे आणखी ४ टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत हे काम प्रगतीपथावर असून तालुक्यातील ज्या कामांना यापूर्वी स्थगिती दिलेली होती त्या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात येईल.. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहे त्यामुळेच आपण आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील विकास कामांना वेग यावा यासाठी सत्तेच्या प्रवाहात सहभागी झालो आहोत.. टाकळी ते वाकी व लोणी ते धानोरा हा रस्ता मोठा आणि चांगला होणार असल्यामुळे या रस्त्यावरील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हे रस्ता काम होण्यापूर्वीच पाईपलाईन चे काम करून घ्यावे जेणेकरून रस्ता झाल्यानंतर खोदकाम करून रस्त्याची खराब होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत परिसरातील सरपंचांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले ,यावेळी बोलताना युवानेते धैर्यशिल थोरवे म्हणाले कि, गेल्या वर्षीच हा रस्ता मंजूर झाला होता.पण सरकार बदलल्यामुळे हा रस्ता प्रलंबित राहिला आता हा रस्ता मार्गी लावला आहे.आता या रस्ताच्या बाजूने वृक्ष लागवड उपक्रम हाती घेऊ आपल्याला जो पाऊस कमी प्रमाणात पडत आहे.त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असेही थोरवे यांनी सांगीतले.सागर दरेकर म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून रस्ताचा प्रश्न प्रलंबित होता.या रस्तासाठी आ. बाळासाहेब आजबे यांनी लक्ष घातल्याने आता हा मार्गी लागणार आहे.या रस्तासह सुंबेवाडी, काकडवाडी याही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही दरेकर यांनी केली. यावेळी सरपंच सावता ससाणे म्हणाले की,आ.आजबे यांचा कारभार सरळ मार्गी आहे.खुनशी राजकारण नसल्याने बेरजेचे राजकारण सुरू आहे.मी माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यकर्ता आहे . परंतु गावच्या व परिसरातील विकासासाठी आपण आ.आजबे यांच्या बरोबर राहणार आहे. यावेळी राजेंद्र लोखंडे, संजय धायगुडे यांची भाषणे झाली. टाकळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तालुक्यातील पहिला पुतळा बसवण्यात आला आहे या पुतळ्यास सभोवती पुतळा सुशोभीकरणासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी भरीव निधी द्यावा अशी येथील धनगर समाजाच्यावतीने मागणी करण्यात आली. पिंपळा येथील कार्यक्रमाचे सुंदर अशी नियोजन करण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. बाबासाहेब भिटे, बाबासाहेब शेंडगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबासाहेब भिटे यांनी केले. सुञसंचालन अर्जुन काकडे यांनी तर उपस्थितांचे आभार गटप्रमुख सुभाष वाळके यांनी करून मानले. नागनाथ चौधरी, कोंडीभाऊ झांबरे, मारुती मुळे,सुनील गाडे, सरपंच भीमराव बोडखे, सरपंच दादा पांडुळे , संभाजी गाडे, विजय शेळके, विठ्ठल नागरगोजे, रामतात्या कर्डिले, नाना एकशिंगे, भाऊसाहेब चौधरी ,अशोक शिंदे, शिवाजी पाटील चौधरी, मोहन बागडे ,लहू तरटे, विष्णुपंत चौधरी, डॉ.दत्तात्रय जाधव, महादेव जगताप, भोर गुरुजी, चांदभाई सय्यद बाबासाहेब भिटे , बाबासाहेब शेंडगे, बलभीम काळोखे, अशोक कुताळ, बन्सी काकडे, आप्पा वाडेकर, डॉ. लाळगे ,चंद्रगुप्त खलासे, राजू सांयबर, महादेव अमृते, चंद्रकांत गुंड, संतोष गुंड, बाबा कोहोक, सतीश कोहोक, शिवम मिरगळ, पोपट शेकडे, मुरलीधर शेकडे, दिलीप तांदळे ,अनिल मोहिते ,राजेंद्र खांदवे, अनिल काळे यांच्यासह टाकळी व पिंपळा परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.टाकळी येथील कार्यक्रमाचे सरपंच भीमराव बोडखे तर पिंपळा येथील कार्यक्रमाचे सुभाष वाळके यांनी आभार मानले.