Ticker

6/recent/ticker-posts

कड्यासाठी मेहकरी धरणातुन होणारी १३ कोटी रु.ची पाणीपुरवठा योजना मार्च अखेरपर्यंत सुरु करू ----- युवा नेते जयदत्त धस

लोकनेते आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत कडा शहरासाठी मेहकरी तलावातून केली जाणारी पाणीपुरवठा योजना मार्च २०२४ अखेरपर्यंत कार्यान्वित करु असे प्रतिपादन युवा नेते जयदत्त धस यांनी केले. कडा शहरातील छत्रपती भाजी मंडई येथे १ कोटी ७० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी हे होते. तर व्यासपीठावर माजी सभापती संजयनाना ढोबळे ,नवनाथदादा कर्डीले, सरपंच युवराज पाटील, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, अनिल ढोबळे ,अण्णासाहेब नाथ ,बंडू शिंदे, राजाबापू कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना युवानेते जयदत्त धस म्हणाले की ,कड्याची बाजारपेठ विकसित करण्यामध्ये लोकनेते आ. सुरेश धस यांचा सिंहाचा वाटा आहे. शहरीकरण व बाजारपेठ वाढल्याने कड्याची ओळख सर्व दूर झाली आहे .कडा शहराची बाजारपेठ संपूर्ण तालुक्यामध्ये मोठी असून आ.सुरेश धस यांच्यावर सर्वसामान्यांनी टाकलेला विश्वास हे याचे गमक आहे.कडा शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न असून यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत १३ कोटी रुपयेची योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.मेहकरी धरणातून हे पाणी येणार आहे .सर्वांना मार्च अखेरपर्यंत शुद्ध पाणी मिळणार आहे.वाडी, वस्त्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्यांचा विकास करण्याचा ध्यास आ. धस यांनी घेतला आहे.कडा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न आ. राम सातपुते यांनी मार्गी लावला असून त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.कडा शहराच्या आणखी विकासासाठी नगरपंचायत झाल्यानंतर जास्तीचा निधी येतो त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पाठपुरावा करावा.नगरपंचायत होणे या ठिकाणी आवश्यक असून येणाऱ्या काळामध्ये कामांचा दर्जा राखला पाहिजे असे मत युवा नेते जयदत्त धस यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना सरपंच युवराज पाटील यांनी सांगितले की ,कडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून मदन महाराज देवस्थान साठी पाच कोटी रुपयांची व मौलाली बाबा दर्गा विकासासाठी पाच कोटी रुपयांची मागणी आ. सुरेश धस यांनी केली असून त्यासाठी लवकरच निधी मिळणार असल्याने कडा शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे .आज एक कोटी ७० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण झाले असून आणखी ५० लाख रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत.माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे म्हणाले की, कडा शहरांमध्ये विविध विकास कामे आ. धस यांच्या प्रयत्नातून झाले आहे. बीड जिल्ह्यातील एकमेव असा बॅडमिंटन हॉल या शहरांमध्ये बनवला गेला आहे. दशक्रियाविधी ओटा,भाजी मंडई ,बाजारओटे ,शाळाखोल्या ,स्मशानभूमी ,शाळांना स्मार्ट टीव्ही आदी विकास कामे आ.धस यांच्या प्रयत्नामुळे झाली आहेत.उपसरपंच बाळासाहेब कर्डिले म्हणाले की ,कड्यांमध्ये सिमेंट रस्ते ,भूमिगत नाली या नागरिकांच्या समस्या सुटल्या असून भविष्यातही आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा रथ असाच पुढे नेण्याचे काम आम्ही करत असून त्यास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले .यावेळी सभापती रमजान तांबोळी म्हणाले की,आ.सुरेश धस यांनी कडा शहरासाठी दोन्ही हातांनी भरभरून विकास निधी दिला आहे.बाजारपेठ वाढविण्यात आ. धस यांचा मोठा वाटा असून आज महाराष्ट्रातील नामांकित बाजार समिती पैकी एकमेव असणारी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती असून या ठिकाणी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते .आ. धस यांच्या प्रयत्नाने कडा शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. यावेळी अण्णासाहेब नाथ यांनीही आ. सुरेश धस यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली.याप्रसंगी संजय मेहेर, बिपीनशेठ भंडारी,सागर खेडकर, भाऊसाहेब भोजने,छगन कर्डीले,शेख अरिफ,महंमद भाई,संपत कर्डीले, बाळासाहेब कर्डीले,चेअरमन ऊद्धव कर्डीले,शेखर कर्डीले,महेश म्हस्के,सचिन घावटे,अप्पा ओव्हाळ,राम ससाणे, सुधीर ढोबळे, राम ढोबळे धनंजय मुथा,सोनू तांबोळी उध्वव कर्डीले सुनील देशमुख, बंडू ढोबळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपतदादा सांगळे यांनी तर आभार दीपक कर्डिले यांनी मानले. सोबत फोटो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या