
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहानिमित्त येथील महाविद्यालयात विद्यार्थी,पालक,
शिक्षक यांच्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पोस्टर प्रेझेंटेशन,प्रसिद्धी
माध्यम, रैली,निबंध स्पर्धा या माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली.नवीन राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला कौशल्याची जोड मिळणार असल्याची
माहिती प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी झुंजारनेताशी बोलताना दिली. प्राचार्य
विधाते म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार
निर्मिती होणार आहे.भविष्यात या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संधीचा उपयोग करून
घेण्यासाठी युवकांना कुशल बनवणे आणि रोजगाराभिमुख बनवणे महत्त्वाचे आहे. नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी निर्माण होत आहेत.
अंमलबजावणीचे टप्पे,येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि संस्था, प्रत्यक्ष
महाविद्यालय,विद्यार्थी यांनी करावयाच्या गोष्टी व शासनाने करावयाच्या गोष्टी या
दोन्हीचा तपशिलांचा विचार करण्यात आला आहे.यावेळी उपप्राचार्य डॉ.भास्कर
चव्हाण,उपप्राचार्य डॉ.एस.एन वाघुले, उपप्राचार्य डॉ.बापू खैरे ,प्रा.डॉ.किरण
कटके,प्रा.डॉ.भगवान आव्हाड, प्रा.डॉ.रवींद्र गांजुरे उपस्थित होते.
0 टिप्पण्या