Ticker

6/recent/ticker-posts

सुखलाल मुथा यांचे शेतकरी वर्गासाठी चांगले काम... तसेच मुथा यांनी आपल्या जीवनामध्ये शून्यातून विश्व निर्मिती केली आहे.. भीमराव धोंडेंचे प्रतिपादन...

सुखलाल मुथ्था यांनी आपलेया परिस्थितीची जाणीव ठेवून भू विकास बँकेमध्ये नोकरी करत असताना समाजातील सर्व घटकांशी विशेषत: शेतकरी वर्गासाठी चांगले काम केल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये शून्यातून विश्व निर्मिती केली आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले. आष्टी येथील जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि प्रथितयश व्यापारी सुखलाल मुथ्था यांच्या वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये त्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.माजी आ.धोंडे पुढे म्हणाले की, खुंटेफळ येथील रहिवासी असलेले सुखलाल मुथ्था यांनी सुरुवातीच्या काळात अत्यंत हालअपेष्टा सोसल्या असून त्यांनी भूविकास बँकेमध्ये नोकरी करत असताना आष्टी तालुक्यातील सर्व समाजातील लोकांशी आणि शेतकरीवर्गाशी अत्यंत प्रेमाचे संबंध ठेवून त्यांना यथोचित सहकार्य केले आहे.त्यांचा स्वभावच अत्यंत गोड असल्यामुळे त्यांना अनेकांनी मित्र म्हणून जवळ केले.त्यांच्या बोलण्यातून त्यांचेकडे माणूस आकर्षित होतो त्यांनी कधीही कोणाचीही निंदां नालस्ती किंवा अपशब्द व्यक्त केले नाहीत त्यांची श्रीमंती त्यांच्या तीन मुलांमध्ये असलेल्या कर्तृत्वातून दिसून येत आहे या यापैकी एक अडत व्यवसायात दुसरा किराणा व्यवसायात आणि तिसरा कापड व्यवसायात यशस्वी व्यापारी आहेत सुखलालजींचे वैशिष्ट्य म्हणजे तात्कालीन सर्व राजकीय पक्षांचे नेते त्यांचे मित्र होते माझ्याबरोबरच आमचे समकालीन साहेबराव दरेकर ,रामचंद्र धस दादा ,जयदत्त क्षीरसागर यांचे समवेत त्यांनी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले आहेत त्यामुळेच आज समाजातल्या सर्व घटकातील लोकांनी सुखकलाल मुथा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्यांच्या मुलांनी आपल्या वडिलांच्या कार्याप्रमाणेच वडिलांच्या पेक्षाही आपण श्रेष्ठ काम करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर यांनी सुकलालजी मुद्दा यांचा १९६० पासून परिचय असून त्यांचे नातेवाईक पिंपळा या गावी असल्यामुळे त्यांचा सतत संपर्क असायचा सुकलालजी यांनी भूविकास बँकेतील सेवेतून शेतकऱ्यांना केलेली मदत ही आजही गावोगावी गेल्यानंतर शेतकऱ्यांकडून कळते माणूस म्हणून सुखलालजी अत्यंत श्रेष्ठ असून त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने समाजाचे मन जिंकले आहे असे सांगितले.युवा नेते जयदत्त धस यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की, आमचे आजोबा यांचेबरोबर जसे संबंध बाबाजींचे होते त्याचप्रमाणे आजही आजही आमच्या घराण्याची म्हणजे माझे वडील आ. सुरेश धस आणि माझ्याबरोबर ही त्यांची तसेच संबंध आहेत म्हणजे तीनही पिढ्यातील लोकांशी संवाद ठेवण्याचे त्यांच्याकडे कौशल्य असल्याचे दिसून येत आहे असे सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे बोलताना म्हणाले की, सुखलाल मुथा हे अत्यंत संयमी प्रामाणिक आणि सर्वांना सतत सहकार्याची भावना जपणारे व्यक्तिमत्व असून त्यांची वयाची शतकपूर्ती आपण याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर करू अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी शुभेच्छा देताना महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्च्याचे उपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे यांनी सुखलाल मुथा यांनी सर्व समाजामधील नागरिकांशी संपर्क ठेवला अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे अशाप्रकारे त्यांच्या कार्याचा गौरव केला.व्यापारी असोसिएशनचे मराठवाडा विभागाचे पदाधिकारी असलेले संजय मेहेर यावेळी बोलताना म्हणाले की, सुखलाल मुथा आमच्या जैन श्रावक संघाचे भूषण असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन समाजाला लाभत असते सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यावेळी बोलताना म्हणाले की ,माझ्या बालपणापासून सुखलालजी मुथ्था यांच्या कुटुंबीयांशी माझा संबंध असून शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये या कुटुंबांकडून मला मार्गदर्शन मिळालेले आहे. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपान निंभोरे शुभेच्छापर बोलताना म्हणाले की, सुखलाल मुथा हे माझे सासरे असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुटुंबाशी आमचे सख्य असून वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत असते असे सांगितले.या कार्यक्रमांमध्ये एडवोकेट चंद्रकांत आजबे डॉ.मधुकर हंबर्डे ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत महाराष्ट्र राज्याचे माजी फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे यांनी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले सुकलालजी मुथा यांच्या नातवंडांनी शुभेच्छा भर कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमासाठी कडा येथील डॉक्टर अशोक गांधी हेमंत पोखरणा बिपिन भंडारी योगेश भंडारी बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बाप्पा मुंडे अड बाबुराव अनारसे, बाबूशेठ भंडारी तहसीलदार शहादेव गीते, शिवसेनेचे भाऊसाहेब लटपटे नगराध्यक्ष जय माजी नगराध्यक्ष भारत मुरकुटे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे गटनेते किशोर झरेकर आष्टी तालुक्यातील समाजाच्या सर्व स्तरातील प्रमुख उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या