आनंद चॅरिटेबल संस्था संचलित,डिप्लोमा इन इंजिनिअरींग अण्ड टेक्नॉलॉजी आष्टी गंगाईनगर आनंद शैक्षणिक संकुलामधील महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.सुप्रिया गोरख सुपेकर हीची नामांकित कंपनी गुगल नंतर आता मलेशियामध्ये एआयए या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मनेजर म्हणून निवड झाली आहे.
या झालेल्या निवडीबद्दल आनंद चॅरिटेबल संस्था संचलित,डिप्लोमा इन इंजिनिअरींग अण्ड टेक्नॉलॉजी आष्टी गंगाईनगर आनंद शैक्षणिक संकुलमध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना इंजिनिअर कु.सुप्रिया सुपेकर म्हणाल्या की, माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. माझ्याकडे डिप्लोमा व डिग्री कालेजसाठी पैसे नव्हते मी पार्टटाईम नौकरी करून मी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून माझे शिक्षण पुर्ण करून आज मलेशियात माझी मॅनेजर म्हणून निवड झाली आहे.माझे अभिनंदन आणि सत्कार आष्टी येथे सर्व खुप ठिकाणी झाले पण मी ज्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये खुप काही शिकले.या यशामध्ये कालेजचा सर्व प्राध्यापक मोलाचा वाटा आहे.आष्टी त्या कॉलेजमध्ये माझा आज सत्कार झाला त्याचे मला खुप अभिमान वाटतो.या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजने मला खुप काही शिकवले कॉलेज व प्राध्यापक यांचे मला कायम सहकार्य राहिले आपल्या ग्रामीण भागातील महाविद्यालय व विद्यार्थ्यामध्ये ही खूप गुणवत्ता आहे.हे माझे कॉलेज आहे.माझ्या कॉलेजमधील विदर्थ्यांना माझे नेहमी सहकार्य राहील या यशामध्ये महाविद्याल व प्राध्यापक यांचा खूप मोलाचा वाटा आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे व सर्व प्रशासन अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी डिप्लोमा इन इंजिनीयरिंग कॉलेजचे प्राचार्य संजय बोडखे, कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ,अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साईनाथ मोहळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बाळासाहेब शिंदे आणि आभार प्रा.सुनिल खिळदकर यांनी मानले. यावेळी प्राध्यापक , प्राध्यापिका व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या