Ticker

6/recent/ticker-posts

सद्भावना सेवाभावी दवाखान्यात ज्येष्ठ नागरिक,महिलांसाठी ५० टक्के सवलत ही कौतुकास्पद बाब ---- माजी आ.भीमराव धोंडे...

आष्टी तालुक्यातील कडा शहरातील नव्याने सुरू होत असलेले मातोश्री हॉस्पिटल संचलित सद्भावना सेवाभावी दवाखान्यामध्ये उपचार शुल्कामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची बाब ही कौतुकास्पद असून यामुळे या दवाखान्यामध्ये सद्भावना आणि सेवाभाव दिसून येईल असे प्रतिपादन भाजपाचे नेते आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिक्षण महर्षी भीमराव धोंडेयांनी अध्यक्षी कडा येथील डॉ.माधवी मुरडे आणि डॉ.अनिल मुरडे दांपत्य आणि मोहसीन पठाण यांच्या मातोश्री हॉस्पिटल संचलित सद्भावना सेवाभावी दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,युवा नेते जयदत्त धस, डॉ.अशोक गांधी,अहमदनगर प्रसिद्ध येथील डॉ.सतीश सोनवणे, डॉ.सुभाष चंद्र वैद्य,कडा बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,कडा वैद्यकीय व्यावसायिक असोसिएशनचे डॉ.पंडित खिलारे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन होत असून याचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णांना होणे आवश्यक आहे प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी घेताना मोफत असलेला व्यायाम केला तर आजारी पडण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे या दैनंदिन व्यायामाकडे सर्व वयोगटातील नागरिकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. डॉ.अनिल मुरडे यांनी सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा करत असताना किमान शुल्क आकारावे कारण मोफत उपचाराची किंमत नसते असे सांगून या हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अहमदनगर येथील कॅन्सर तज्ञ डॉ.सतीश सोनवणे म्हणाले की,कॅन्सर या आजाराविषयी समाजामध्ये खूप गैरसमज आहेत समजापेक्षा गैरसमजच जास्त आहेत कॅन्सर झाला म्हणजे सगळं कॅन्सल झालं असं नसून नियमित तपासणीमध्ये प्रथम स्टेजचा कॅन्सर निष्पन्न झाला तर ९० टक्के ते १०० टक्के तो रुग्ण बरा होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात आल्यानंतर बरा होण्याचे प्रमाण ६० ते ८० टक्के असते तिसऱ्या टप्प्यात देखील आजाराची स्थिती लक्षात आल्यास ४० ते ५० टक्के रुग्ण वाचण्याची शक्यता असते.त्यामुळे दैनंदिन तपासणी ही अत्यंत महत्त्वाची असते. नागरिकांनी कॅन्सरपासून बचाव करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तंबाखूचे सेवन न करणे, महाराष्ट्रातील अडीच कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात त्यातल्या ३० टक्के लोकांमध्ये लोकोप्लेकिया होतो पण इम्युनिटी कमी असेल तर त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होते त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन जगणे महत्त्वाचे आहे यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,डॉ.सोनवणे अहमदनगर, डॉ.अशोक गांधी,सभापती रमजानशेठ तांबोळी, जयदत्त धस, बाबूशेठ भंडारी आणि जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांची समायोजित भाषणे झाली.यावेळी माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे, बाबुसशेठ भंडारी,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते,डॉ.युवराज तरटे, पत्रकार उत्तम बोडखे,शंकर देशमुख,राजेश राऊत,रघुनाथ कर्डिले,डॉ.सांगळे,प्रा.डा. बाळासाहेब तरटे,प्रा.डा.विनोद ढोबळे आदी राजकीय,सामाजिक, आर्थिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या कार्यकार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन श्रीमती दिप्ती शुक्रे तर आभार प्रा.मोहसीन पठाण यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या