Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.डॉ.म्हातारदेव म्हस्के यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

आष्टी तालुक्यातील सावरगाव घाटचे भूमिपुत्र आणि सध्या अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे प्रा.डॉ.म्हातारदेव म्हस्के यांना अहमदनगर जिल्ह्यातील उपदेशकच्या १७ व्या. वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या यशाबद्दल आ.सुरेश धस , माजी आ.भीमराव धोंडे, आ.बाळासाहेब आजबे , माजी सभापती साहेबराव म्हस्के, प्राचार्य उमाशंकर बनाळे, रेसिडेन्शिअल महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पोकळे, मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे,सचिव बाबासाहेब म्हस्के,सोसायटी चेअरमन दत्तात्रय म्हस्के,पत्रकार उत्तम बोडखे, सरपंच चंदनशिव , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गायके, उद्योजक अशोक म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव म्हस्के प्रा.सुभाष म्हस्के,बँक अधिकारी विकास म्हस्के, बाळासाहेब गुगळे, आसाराम म्हस्के राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील आदि मान्यवरांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या