
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली कडा शहरांमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. आज रविवार दिनांक 30 रोजी कडा येथील छत्रपती चौकामध्ये युवा नेते जयदत्त धस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच युवराज पाटील,उपसरपंच बाळासाहेब कर्डिले यांनी केले आहे.
कडा शहरांमध्ये आजपर्यंत कोट्यावधी रुपयाची विकास कामे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास गेली आहेत. कडा ग्रामपंचायत गेल्या तीस वर्षापासून आमदार धस यांच्या ताब्यात असून यावर्षीही सात महिन्यापूर्वी पुन्हा ग्रामपंचायतवर आ धस यांनी निर्विवादपणे विजय मिळविला आहे. सरपंच म्हणून लताबाई भिमराव पाटील तर उपसरपंच पदी बाळासाहेब कर्डिले विराजमान झाल्यानंतर विविध विकास कामे कडा शहरांमध्ये करण्यात आली आहेत.त्यामध्ये भाजी मंडई सुधारणा ,स्मशानभूमी सुशोभीकरण ,धुमाळ गल्ली सिमेंट काँक्रीट रस्ता ,जाचक यांचे घर ते सुनील कर्डिले यांचे घर ,वार्ड क्रमांक एक शौचालय बांधकाम ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक खोली बांधकाम ,ग्रामपंचायत शेजारी पेव्हर ब्लॉक बसवणे ,मुलानवाडा येथे सिमेंट रस्ता ,अंबादास शिरोळे यांचे घर ते शेरी सिमेंट रस्ता ,अंबादास शिरोळे यांचे घर ते सत्यवान ढोबळे यांचे घर सिमेंट रस्ता ,जिजाऊ कॉलनी भूमिगत नाली व सिमेंट रस्ता ,बाजारतळ भूमिगत नाली ,सुंदर नगर भूमिगत नाली ,नवबुद्ध विकास योजना समाज मंदिर, जन सुविधा सुंदर नगर येथे सिमेंट रस्ता, जन सुविधा जैन स्थानक येथे सिमेंट रस्ता इत्यादी एक कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या कामांचा लोकार्पण सोहळा युवा नेते युवा जयदत्त भैया धस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार असून या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच युवराज पाटील उपसरपंच बाळासाहेब कर्डिले यांनी केले आहे. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी ,माजी सरपंच अनिल ढोबळे ,ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
0 टिप्पण्या